Success Stories

गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये नुकसान झेलत असलेला बळीराजा अक्षरशा बेजार झाला आहे. यामुळे अनेक शेतकरीपुत्र शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्याचे स्वप्न बघतात. त्यांना शेती म्हणजे तोट्याची असे वाटते मात्र आज आम्ही आपणांस अशा एका अवलियाची माहिती देणार आहोत ज्याने विदेशात शिक्षण पूर्ण केले विदेशातच नोकरी केली मात्र आता मायदेशी परतून आपल्या शेतकऱ्यांची मदत करत आहे.

Updated on 26 April, 2022 6:07 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये नुकसान झेलत असलेला बळीराजा अक्षरशा बेजार झाला आहे. यामुळे अनेक शेतकरीपुत्र शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्याचे स्वप्न बघतात. त्यांना शेती म्हणजे तोट्याची असे वाटते मात्र आज आम्ही आपणांस अशा एका अवलियाची माहिती देणार आहोत ज्याने विदेशात शिक्षण पूर्ण केले विदेशातच नोकरी केली मात्र आता मायदेशी परतून आपल्या शेतकऱ्यांची मदत करत आहे.

हा अवलिया उत्तर प्रदेश मधील पिलिभित येथील असून त्याचे नाव आहे हरिजीत सिंग. हरिजीत मशीनचा उपयोग करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाचे बेणे तयार करून देतात. हरीजीत यांनी उत्पादित केलेले बेणे पंचक्रोशीत मोठे प्रसिद्ध असून त्याची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

उसाच्या बियाण्याची मागणी लक्षात घेता हरिजीत यांनी आपल्या गावात एक ऑफिस खोलले आहे व तिथेच ते बाजार भरून त्याची विक्री करत असतात. विशेष म्हणजे खरेदीसाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या डोळ्यासमोर उसाचे बेणे तयार होताना बघतात आणि तेच खरेदी करतात.

2008 मध्ये हरजीत एमबीए शिकण्यासाठी आयर्लंडला गेला होता. शिक्षण संपवून तो चांगल्या पगारावर काम करू लागला. परदेशातील नोकरी, मोठं पॅकेज, चांगली जीवनशैली सोडून हरजीत 2016 मध्ये आपल्या भावाकडे घरी आला.  मार्केटिंगची पदवी, भावाच्या शेतीतून मिळालेल्या अनुभवामुळे शेतीत नाविन्य आणण्याचा विचार सुरू झाला.  त्यांनी सोशल मीडियावर शेतीविषयक नवनवीन माहिती शोधण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना घरच्यांचाही पूर्ण पाठिंबा मिळाला.

हरजीतने 2016 मध्ये मशीनद्वारे उसाचे बियाणे तयार केले.  पूर्वी हे बियाणे त्यांच्या शेतात अल्प प्रमाणात वापरले जात होते. आज 10 एकर शेतजमिनीत हे बियाणे तयार केले जात आहे. हरजीत सांगतात की, ऊस उत्पादनासाठी ऊस उत्पादक शेतकरी शेतात उसाचे दोन तुकडे करून ऊसाचे पीक तयार करायचे. त्यामुळे बराचसा ऊस खराब होतं असे. 

उसातील गुठळ्यापासून बी तयार होते. या गुठळ्या मशीनने कापून आम्ही बेणे तयार केले आहे. ज्याला आपण डोळा म्हणतो. शेतात लहान तुकडे पेरणे तुलनेने सोपे आहे. या पद्धतीने तयार केलेल्या उसाचे बेणे 80 टक्के उगवणक्षमता देण्यास सक्षम आहे. यामुळे, उत्पादन देखील वाढते. खर्चही कमी आहे. ऊस लांब व जाड निघतो असे हरीजीत यांनी स्पष्ट केले.

English Summary: Success story of MBA farmer !! Did jobs abroad after doing MBA; Now he is helping the sugarcane growers to return home
Published on: 26 April 2022, 06:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)