success story : आजकाल तरुण वर्ग शेती करण्याकडे वळला आहे. नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीतील उत्पादन वाढवण्यास तरुण शेतकरी मदत करत आहेत. यातच आता उच्चशिक्षित तरुणदेखील जिद्दीच्या जोरावर शेती क्षेत्रात अफाट यश मिळवताना दिसत आहेत. असंच यश संपादन केलं आहे एका उच्चशिक्षित जोडप्याने. मध्यप्रदेश मधील उज्जैन येथील तरुण जोडप्याने आपल्या अभिनव उपक्रमाने सगळ्यांची मने जिंकली आहेत.
अर्पित आणि पत्नी साक्षी माहेश्वरी हे सगळ्यांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. या दोघांनी आपली आयटी क्षेत्रातील करोडोंची नोकरी सोडून शेती करण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे आयआयटी क्षेत्रात यांना सुवर्णपदक देखील मिळाले आहे. सध्या हे दोघे आपल्या दीड एकर जमीनीत नैसर्गिक पध्दतीचा अवलंब करून शेती करत आहेत. त्यांनी फळे, भाज्या, कडधान्ये आणि तृणधान्ये आदी पिकांची लागवड केली आहे.
दोघांनी जवळपास 75 प्रकारची रोपे लावली असून त्यापैकी अर्धे तर फलदायी आहेत. यामध्ये केळी, पपई, पेरू, कोथिंबीर, डाळिंब, संत्री, करवंद, पालसा, करवंद आणि तुती सारख्या फळांचा समावेश होतो. गेली पाच वर्षे ते बडनगरमध्ये राहत आहे. अर्पित माहेश्वरी यांनी आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
पूर्व परीक्षेत तर अर्पित माहेश्वरी यांचा भारतात दुसऱ्या क्रमांक आला होता. मुंबईत पार पडलेल्या फिजिक्स ऑलिम्पियाड 2007 मध्ये साक्षी आणि अर्पित
माहेश्वरी या दोघांनी सुवर्णपदक पटकावले होते. साक्षी यांनी आयआयटी चे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. त्या दोघांनी 2013 मध्ये लग्न केले. बंगळुरूमध्ये काही दिवस काम करून नंतर ते अमेरिकेला गेले.
पूर्व परीक्षेत तर अर्पित माहेश्वरी यांचा भारतात दुसऱ्या क्रमांक आला होता. मुंबईत पार पडलेल्या फिजिक्स ऑलिम्पियाड 2007 मध्ये साक्षी आणि अर्पित
माहेश्वरी या दोघांनी सुवर्णपदक पटकावले होते. साक्षी यांनी आयआयटी चे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. त्या दोघांनी 2013 मध्ये लग्न केले. बंगळुरूमध्ये काही दिवस काम करून नंतर ते अमेरिकेला गेले.
2016 साली दक्षिण अमेरिकेच्या सहलीला गेले असताना विकास व आधुनिकीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या निसर्गाचा ऱ्हास त्यांनी पहिला. जगातील सर्वात सुंदर जंगले, बेटे तसेच पर्वतांवर हा झालेला नैसर्गिक ऱ्हास होता. विकासकामांसाठी लाखोंच्या संख्येने झाडे तोडून सिमेंट-काँक्रीटची जंगले तयार केली जात होती.
शिवाय अधिकाधिक उत्पन्न यावे यासाठी कीटकनाशकांचा अति वापर भविष्य धोक्यात येऊ शकते. हे चक्र असंच चालू राहिले तर निसर्गही धोक्यात येऊ शकते असं त्या दोघांना वाटले. हा सर्व प्रकार पाहून आणि भविष्याचा विचार करून आम्ही दोघेही आतून हादरवल्याचे अर्पित सांगतो. निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी चांगल्या मार्गांचा वापर करून आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचे त्यांनी ठरवले.
त्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवायचं ठरवलं. पैशापेक्षा आपले आरोग्य आणि आपला आनंद जास्त महत्वाचा आहे. असं त्यांना वाटू लागले म्हणून त्यांनी करोडोंची नोकरी सोडून निसर्गाशी नाळ जोडण्याचे ठरवले. आणि कायमस्वरूपी शेती करण्याचा निर्धार त्यांनी केला. तेथून परतल्यानंतर त्यांनी उज्जैन जिल्ह्यातील बडनगर शहरात दीड एकर जमीन खरेदी केली. व तेथून शेती करायला सुरुवात झाली.
अर्पित आणि साक्षी माध्यमांशी बोलताना म्हटले कि, "सध्या आम्ही शाश्वत शेतीचे मॉडेल (परमा कल्चर) तयार करण्याकडे लक्ष देत आहोत. यात आम्ही जैव विविधता प्रणालीनुसार शेती करण्यावर भर देत आहोत. सध्या आम्ही दीड एकर जमिनीवर 75 प्रकारच्या रोपांची लागवड केली आहे. यात केळी, पपई, पेरू, कोथिंबीर, डाळिंब, संत्री, करोंडा, पालसा, तुती या फळांचा समावेश आहे.
जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी एका फळ रोपासह चार जंगली झाडे सपोर्ट ट्री म्हणून लावली आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही पती-पत्नीने कधी शेतात पाऊलही ठेवले नव्हते. देशभरातील सेंद्रिय शेतात आम्ही स्वयंसेवक म्हणून काम केले". पुढे ते असंही म्हणाले, आमच्यासाठी ग्रामीण आयुष्य जगणे फार नवीन होते. सध्या आम्ही तीन तास ऑनलाइन जॉब करतो आणि राहिलेला संपूर्ण वेळ हा शेतीला जातो.
अर्पितने यांनी सांगितले की, बडनगरमध्ये एक मित्र राहतो. बडनगर येथे जमीन आढळल्याने आम्ही येथेच शेती करण्याचे ठरवले. पुढे ते म्हणाले की, आम्ही पिके देखील घेतो मात्र ते विकत नाही. खर्च भागवण्यासाठी दोघेही 3 तास ऑनलाइन पार्ट टाइम जॉब करत आहेत. बडनगरमध्ये काळ्या मातीमुळे त्यांनी करंजचे झाड लावले आहे.
करंज हवेतून नायट्रोजन काढते व जमिनीवर पाठवते. शिवाय या झाडाच्या पानांचा जमिनीत खत म्हणून उपयोग होतो. त्यांना जैवविविधतेच्या आधारे शाश्वत शेतीचे मॉडेल जगासमोर मांडायचे आहे. शाश्वत शेतीचे मॉडेल म्हणजेच पर्माकल्चर हा विचार तसेच तंत्र हे ऑस्ट्रेलियापासून जगभर पसरले आहे. या तंत्रामुळे जमीन सुपीक राहते. आमचे कृषी पर्यटन पाहण्यासाठी दिल्ली, मुंबई, गोवा, मणिपूर आणि परदेशातूनही नागरिक येत असल्याचं या दोघांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
दुकानदारांनो शेतकऱ्यांना फसवत असाल तर सावधान; मंत्री सुनील केदार यांची मोठी घोषणा
केंद्र सरकारच आहे शेतकऱ्यांचा शत्रू? आता साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी सुरू
Published on: 25 May 2022, 03:06 IST