देशात सध्या नवयुवक शेतकरी बांधव (Farmers) शेती आणि शेतीपूरक व्यवसायात (Farming Business) उडी घेत असून यापासून चांगले उत्पन्नदेखील कमवीत आहेत. सुशिक्षित नवयुवक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती व शेतीपूरक व्यवसायात हाय-टेक तंत्रज्ञान आणत असून यामुळे त्यांना चांगली तगडी कमाई होत आहे शिवाय इतर शेतकऱ्यांना देखील यातून नवीन गोष्टी आत्मसात करता येत आहेत.
गुजरात मधील पालीताना येथे राहणाऱ्या एका उच्चशिक्षित नवयुवकाने देखील शेती व्यवसायाची कास धरत लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. मित्रांनो या अवलिया नवयुवकांचे नाव आहे मेहुल सुतारिया. मेहुल गाईच्या दुधापासून तूप आणि मिठाई बनवून आजच्या घडीला लाखोंची कमाई करत आहे. विशेष म्हणजे मेहुल संपूर्ण देशात त्याचे उत्पादन विकत आहे.
मेहुल यांनी एक आधुनिक गोठा बांधला आहे. मेहुल अंच्याकडे आजच्या मितीला 72 गिर जातीच्या गायी आहेत. पशुपालन व्यवसायात मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे यावर्षी त्यांना गुजरात सरकारचा उत्कृष्ट पशुपालनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. सध्या मेहुल आपल्या व्यवसायातून दोन कोटीची उलाढाल करत आहेत.
‘या’ झाडाची शेती बनवणार मालामाल; एकच झाड विकले जाते 50 हजाराला; वाचा याविषयी
मेहुल यांचे वय 32 वर्ष आहे. मेहुल यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. MBA केल्यानंतर त्यांनी सुमारे 8 वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. MBA मार्केटिंग मध्ये केले असल्याने त्यांना या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. मेहुल सांगतात कि, त्यांच्या वडिलांचे गायीवर खूप प्रेम होते. त्यांना सुरुवातीपासूनच गायी पाळण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या कामामुळे ते शक्य झाले नाही. मात्र सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी मेहुल यांना गाय पालन करण्याचा सल्ला दिला. मग काय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहुल यांनी 3 गायींपासून डेरी फार्मिंगला सुरुवात केली.
हळुहळू मेहुल यांना गाईं पालणाची ओढ लागली. मेहुल यांच्या मते, सध्या बाजारात दुग्धजन्य पदार्थांची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाजारातील मागणी बघता त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. मेहुल सांगतात की, बहुतांश ठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेचाही प्रश्न उभा झाला आहे. शुद्ध दूध विकत घेणे फार कठीण काम झाले आहे. या गोष्टींचा एकत्रित विचार करता व्यवसायाच्या दृष्टीने याला खूप चांगला वाव असल्याचे मेहूल यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी या व्यवसायाची व्याप्ती वाढवली.
1 लाखात घरी घेऊन जा मारुती इको; कसं ते जाणुन घ्या
नोकरी सोडून दुग्धव्यवसाय सुरू केला
मेहुलने नोकरी सोडली आणि पूर्णवेळ डेअरी फार्मिंग करण्यास सुरुवात केली. दुग्धव्यवसायावर संशोधन देखील केले. काही महिन्यांच्या संशोधनानंतर आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर, 2018 मध्ये त्यांनी हरिबा डेअरी फार्म नावाचा स्टार्टअप सुरू केला.
त्यानंतर त्यांनी गायींची संख्या वाढवत आपल्या डेरी फार्मिंग व्यवसायाची व्याप्ती वाढवली. त्यांनी वडिलांसोबत गुढाणा गावात एक सुसज्ज गोठ्याची निर्मिती केली. सुमारे 30 बिघा जागेत त्यांनी डेरी फार्मिंग व्यवसायासाठी गोठ्याची निर्मिती केली. गायी ठेवण्यासाठी सिमेंटऐवजी मातीने घर बांधले. सध्या त्यांच्याकडे 72 गिर जातीच्या गायी आहेत. ज्यातून दर महिन्याला 600-700 लिटरपर्यंत दूध मिळतं असल्याचा मेहुल यांचा दावा आहे.
मेहुल यांच्या मते, डेरी फार्मिंग व्यवसाय मध्ये अनेक आव्हाने आहेत. यामध्ये घरोघरी जाऊन दूध विकणे हे खूप अवघड काम आहे. शिवाय, यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळही लागते. म्हणुन मेहुल यांनी खूप संशोधन आणि बाजार विश्लेषण केल्यानंतर ठरवलं की दुध विकण्याऐवजी त्यापासून उत्पादन तयार करून बाजारात पाठवायचं. यामुळे दूध विकण्यासाठी होणारी भटकंती कायमची दुर होणार होती आणि उत्पन्नात देखील भरीव वाढव होणार होती.
यानंतर मेहुल यांनी वैल्यू एडिशन करण्यास सुरुवात केली आणि दुधापासून तूप तयार करून बाजारात विक्री सुरू केली. यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत मार्केटिंग केली शिवाय त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. आता त्यांना देशाच्या विविध भागातून ऑर्डर येऊ लागल्या आहेत. निश्चितच मेहुल यांनी केलेले हे कार्य इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे सिद्ध होत आहे.
Published on: 20 May 2022, 10:53 IST