Soybean: देशात सध्या खरीप हंगाम (Kharip Season) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस (Rain) पडत असल्यामुळे या हंगामातील पिकेही जोमात आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पिके जमीनदोस्त झाली आहेत. प्रभणीमधील एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन पिकाला भरपूर शेंगा लागल्या आहेत. एका रोपाला तब्बल 417 शेंगा लागल्या आहेत.
सोयाबीनला (Soybean) बाजारात चांगला भाव देखील मिळत आहे. मात्र सोयाबीन दरात हळूहळू घसरण होईल लागली आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे पीक अजून बाजारात येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. मात्र त्याआधीच भाव घसरताना दिसत आहेत.
सोयाबीनला बाजार चांगला मिळत असल्याने अनेक शेतकरी आता सोयाबीनची लागवड करत आहेत. मात्र यंदा सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्याने शेंगाचा भरल्या नाहीत. मात्र परभणीच्या (parbhani) शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ त्याला आज मिळत असल्याचे दिसत आहे.
पशुपालकांनो सावधान! लम्पीचं नाही तर या 5 रोगांमुळे दुभत्या जनावरांचा होऊ शकतो मृत्यू
पालम तालुक्यातल्या मुक्काम खोरस येथील शेतकरी गणेश रामराव दाढे (Farmer Ganesh Dadhe) हे दरवर्षी कपाशीची लागवड करतात. मात्र यंदा त्यांनी सोयाबीन पिकाची लागवड करण्याचे ठरवले आणि सर्वच शेतामध्ये सोयाबीनची लागवड केली.
शेतकरी गणेश दाढे यांच्या सोयाबीन लागवडीच्या निर्णयाला घरच्यांसह गावातील मित्रांनी देखील विरोध केला होता. तरीही या शेतकऱ्याने सोयाबीनची पेरणी केली आणि जिद्दीने त्या सोयाबीनची निगराणीही केली. त्याचेच फळ आज त्यांना मिळत आहे. सोयाबीन पिकाला लागलेल्या शेंगा पाहून सर्वजण आवाक झाले आहेत.
Buffalo Farming: महाराष्ट्रातील ही म्हशीची जात देतेय 1005 लिटर दूध; जाणून घ्या खासियत
शेतकरी गणेश दाढे यांनी सोयाबीनच्या KDS 726 वाणाची लागवड केली आहे. २५ एकरमध्ये लागवडीसाठी त्यांना १८ बॅगा बियाणे लागले आहे. विशेष म्हणजे या वाणाची बॅग 22 किलोची असते. इतर बॅगा 30 किलोच्या असतात. पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतर त्यांना एकरी 15 क्विंटल प्रमाणे विक्रमी 300 क्विंटल पेक्षा जास्त सोयाबीन होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन पिकाची पेरणी केल्यापासून ते काढणीपर्यंत निटनिटके व्यवस्थापन केले तर ते पीक दर्जेदार उत्पन्न देते. तसेच अवकाळी पाऊस आणि किडीपासून सोयाबीन पीकाचा बचाव झाला तर कष्टाचे फळ नक्की मिळते ते या शेतकऱ्याच्या जिद्दीवरून दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
सुवर्णसंधी! सोन्याचे दर ७ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजचे दर
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! निर्णय झाला, या दराने मिळणार DA
Published on: 22 September 2022, 05:55 IST