Success Stories

भारत हा देश एक मोठा श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. भारत हा एक विकसनशील देश आहे. यामुळे देशात अनेक श्रीमंत लोक राहतात. असे असताना आता भारतात जगातील सर्वाधिक श्रीमंत गाव आहे. याची माहिती अनेकांना नाही. हे गाव गुजरातमध्ये असून या गावाचे नाव माधापर असे आहे.

Updated on 26 May, 2022 1:58 PM IST

भारत हा देश एक मोठा श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. भारत हा एक विकसनशील देश आहे. यामुळे देशात अनेक श्रीमंत लोक राहतात. असे असताना आता भारतात जगातील सर्वाधिक श्रीमंत गाव आहे. याची माहिती अनेकांना नाही. हे गाव गुजरातमध्ये असून या गावाचे नाव माधापर असे आहे. या गावात मोठ्या प्रमाणावर लोक श्रीमंत आहेत.

माधापरमध्ये सुमारे 17 बँका आहेत आणि येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. यामुळे याठिकाणी किती पैसा असेल याचा अंदाज तुम्हाला येईल. याठिकाणी शाळा-कॉलेज, हॉस्पिटलचीही चांगली सोय आहे. या गावात तलाव आणि उद्यानंही आहेत. अनेक शहरातील सोयी या गावात आहेत.

आता हे गाव इतके श्रीमंत कसे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर यामागे एक कारण आहे. ते म्हणजे येथील बहुतांश लोक परदेशात राहतात. यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसे आहेत. असे असले तरी आता अनेकजण या गावात परतले आहेत. त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. यामधून देखील त्यांना चांगले पैसे मिळतात.

शेतकऱ्यांना खतासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत, मोदी सरकारने केली शेतकऱ्यांच्या हिताची घोषणा

असे असले तरी आजही या गावातील लोक मोठ्या संख्येने परदेशात राहतात आणि हे लोक आपल्या कुटुंबियांना मोठी रक्कम पाठवतात. यामुळेच येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाखांहून अधिक रुपये आहेत. यामुळे या गावाची आणि या गावातील बँकेंची एक वेगळी ओळख आहे. या गावातील सोयी सुविधा बघून अनेकांना नवल वाटते.

पेट्रोलनंतर आता खाद्यतेलाचे दरही होणार कमी, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

या गावातील सुमारे 65 टक्के लोक एनआरआय आहेत. 1968 मध्ये लंडनमध्ये माधापर व्हिलेज असोसिएशनची स्थापना झाली, यावरून इथले लोक किती मोठ्या प्रमाणात परदेशात जातात याचा अंदाज येतो. यामुळे या गावाची देशात चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या;
सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत
जुन्नरच्या हापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! GI मानांकनाबाबत शरद पवारांकडून आश्वासन
'साखर निर्यात बंदीचा निर्णय मुर्खपणाचा, दिल्लीत अति शहाण्या लोकांनी याचा विचार करून निर्णय घ्यावा'

English Summary: richest village world India, everyone Rs 15 lakh account, read reason wealth ...
Published on: 26 May 2022, 01:58 IST