Success Stories

लिंबूवर्गीय फळांचा उद्योग भारतामध्ये प्रमुख फळांच्या बागकामामधील एक आहे. शेतकरी कल्याण मंत्रालयच्या बागकाम सांख्यिकी प्रभागाच्या अनुसार भारताने ०.९४ मिलियन हेक्टरमध्ये १२.७५ टन हेक्टरच्या प्रमाणे १२.०४ मिलियन टन लिंबूवर्गीय फाळांचे उत्पादनाची स्थिती आदर्श ठेवणारी आहे.

Updated on 15 October, 2020 4:46 PM IST


लिंबूवर्गीय फळांचा उद्योग भारतामध्ये प्रमुख फळांच्या बागकामामधील एक आहे. शेतकरी कल्याण मंत्रालयच्या बागकाम सांख्यिकी प्रभागाच्या अनुसार भारताने ०.९४ मिलियन हेक्टरमध्ये १२.७५  टन हेक्टरच्या प्रमाणे १२.०४ मिलियन टन लिंबूवर्गीय फाळांचे उत्पादनाची स्थिती आदर्श ठेवणारी आहे.  मध्य भारतात लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनाच्या बागकामाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेची स्थापना  १९८५ मध्ये नागपूर येथे झाली आणि आतापर्यंत हे केंद्र उच्च तांत्रिक लिंबूवर्गीय संशोधन केंद्राच्या आजवरच्या माध्यमातून संपूर्ण लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या आदर्श वाक्यासोबत काम करत आहे.

दरम्यान भारतात लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनाच्या दृष्टीकोनातून अधिक पीक देणारी व अल्प काळात पिकवणारी प्रजाती, रोग प्रतिकारकमुळे मायक्रो बिअर केसार्टियम, पोषक तत्वांची मात्रा, सुरक्षात्माक रसायन आणि सिंचन, नर्सरी प्रबंधन व कापणी तंत्रज्ञान केंद्राद्वारे मानविकृत केली गेली आहे. हे  शेतकऱ्यांनाही हस्तांतरित ककरण्यात आले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. असेच एक अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आहेत ज्यांनी यातून यश मिळवलं आहे. प्रमोद जगन्नाथ वासनकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.  प्रमोद वासनकर हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांदली गावात राहतात. त्यांनी  लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात तंत्रज्ञान वापरले आहे. प्रमोद वासनकर हे ५८ वर्षाचे प्रगतीशील शेतकरी आहेत.  

हेही वाचा : संकटाचे केले सुवर्ण संधीत रुपांतर; केळीच्या शेतीतून कमावले लाखो रुपये

 

प्रमोद वासनकर हे अमरावातीतील परतवाडा या पर्वतीय क्षेत्रातील ६० एकर लिंबूवर्गीय बागाचे मालक आणि व्यवस्थापक आहेत. प्रमोद वासनकर यांनी २० वर्षापासून लिंबूवर्गीय शेती करतात. ते आपल्या शेतात ८ ते ९ तास काम करतात तसचे ५ मजूरांच्या साहाय्याने जवळजवळ ६ हजार झाडांची सतत काळजी घेतात. वासनकरयांच्या वडिलांनी १९८५ मध्ये फळबागेची लागवड केली होती. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था या केंद्राच्या संपर्कात वर्ष २००० साली जेव्हा वासनकरांनी फाळांचा त्याच्या बागकामात समावेश केला. तेव्हा त्यांना केंद्र व पंजाबराव देशमुखे विद्यापीठाच्या एका परिचित माध्यमातून संशोधन उपक्रमांबद्दल माहिती मिळाली. तेव्हापासून लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीकरीता त्यांनी वाटचाल केली. केंद्राचे तंत्रज्ञान अंमलात आणून त्यांच्या बागेतील उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये सतत सुधार झाला आहे. कोणत्याही समस्येच्या निराकरणासाठी ते केंद्राच्या वैज्ञानिकांना संपर्कात असतात.

 


तंत्रज्ञानाचा सकारात्मक प्रयोग - वासनकर हे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन फार उत्साहाने सकारात्मक परिणाम प्राप्त करत आहेत.  जवळपासचे भरपूर फळांचे उत्पादक त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात.

नर्सरी व्यवस्थापन - वासनकर हे अडीच एकर क्षेत्रात असलेल्या घरच्या नर्सरीत त्यांचे रोपे तयार करतात. त्यांनी नागपूर संत्र्याच्या बागकामासाठी  बऱ्याच प्रकारचे मुळ जसे नीबू, खेशवाशा, ड्रायफोलिएट, रंगपूर लाईम आणि एलिमो रफ लेमन अंमलात आणले आहे.  एलिमो एक आशाजनक मूळ आहे ज्याला केंद्राद्वारे विकसित केले गेले आहे. त्यांनी एलिमोवर मोसंबी आणि नींबू सुद्धा तयार केले आहे.  काळ्या प्लॉस्टिकच्या थैलीत माती, शेणखत व रेतीचे मिश्रण वापरुन त्यांनी त्यांचे रोपे तयार केलेली आहेत.

शेती व प्रकार  - संशोधन केंद्राद्वारे विकसिती झालेल्या अधीकांश बागकामाच्या जातींना वासनकरांद्वारे विकसित केल्या जात आहे. त्यामधून  लिंबू, नागपरी संत्रे, ग्रेपफ्रुट पेमेलो, ब्लड रेड, कटर, वेलैसिया इत्यादी समाविष्ट आहे.

बाग व्यवस्थापन- वासनकर हे खाली पडलेले आणि संक्रमित झालेले फळे काढून टाकतात. बाग स्वच्छ ठेवतात. दरवर्षी सुकलेल्या (स्प्रिंग) फांद्यांनाी कापतात ज्यामुळे लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाच्या वाढीला चालना मिळते. झाडांची  प्रत्येक पर्यायी वर्षात कापणी करतात. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये आंबिया बहारासाठी आणि मार्चमध्ये मृग बहारासाठी तसेच नर्सरीमधून बागेत रोपे लावण्याच्या दरम्यान ते किटकनाशकांच्या सोबत रोपांच्या मुळांचा सुद्धा उपचार करतात. रोपे लावण्याच्या वेळेला जवळ-जवळ ५ मी बाय ५ मी योग्य अंतर ठेवतात.  त्यांनी जवळ-जवळ २४० झाडे  प्रति एकरसोबत उच्च घनता  असलेल्या नागपूरी संत्राचा सुद्धा अभ्यास केलेला आहे.

 


सिंचन व्यवस्थापन -  बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापन फार महत्वाचे असते. यात वासनकर सिंचन ठिंबक पद्धतीने करतात. नीबूवर्गीय फळांचे बागकामात ठिबक सिंचन पद्धत ही पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत जवळजवळ  ६१ टक्के पाण्याची बचत करते. जवळपास ५० टक्के च्यावर वृद्धी देते. वासनकर आपल्या  बागेला नागपुरी संत्र्याच्या आंबिया बहरात डिसेंबर मध्यापासून ते जानेवारी मध्यापर्यंत व मृग बहरात मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जूनच्या दुसऱ्या  आठवड्यापर्यंत सिंचन करतात.

पोषक तत्व व्यवस्थापन - वासनकर संशोधनाच्या तंत्रज्ञानानुसार, वर्षातून चारवेळा आंबिया व मृग बहाराला पोषक तत्व देतात. ते आंबिया बहारात  जोनेवारी, एप्रिल, तसेच जूनमध्ये पोषक तत्व देतात. फळांच्या मात्रांच्या आधारे ते खातांना  बदलत राहतात.  परंतु यात मुळ रुपाचे १.७५ किग्रॅ, डी.ए.पी. ७५० ग्रॅम, १०-२६-२६-१ किग्रॅ पोटाश व १ किलो ग्रॅम  अमोनियम असतो. ते लोखंड व बोरॅक्स सोबत सुक्ष्मतत्व मिसळून आपल्या झाडांना पोषण देतात.

झाडांचे संरक्षण - वासनकरांनी आपल्या संशोधनामार्फत किटक व्यवस्थापन व निंबूवर्गीय फळांमध्ये  गमोसीसच्या प्रतिबंधासाठी मूस नाशक किंवा किटकनाशाकंचया शिसराकावाला कमी करण्यासाठी  आणि फळांचे माशांपासून रक्षण करण्यासाठी चिकट जाळेपण लावले आहेत. एकदा २००४ मध्ये कोळशी प्रार्दुभावामुळे त्यांना भारी आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. परंतु संशोधनात प्रख्यात असलेले किटशास्त्र वैज्ञानिक डॉ.वी.जे शिवनकर तसेच डॉ. सी. एन.राव यांचा सल्ला घेऊन पुन्हा बागेत सुधारणा केली.

 


तोडणी / विपणन - फळे परिपक्क होताच वासनकर त्यांना फार संभाळून सावधनीने त्या फळांचे वर्गीकरण करुन डब्यात भरुन ट्रकद्वारे परतवाडाच्या वॅक्सिग फ्लांटवर नेतात. वॅक्सींसाठी त्यांनी प्रती कारटन २० रु शुल्क द्यावा लागतो. त्यानंतर त्यांचे फळे विभिन्न राज्यात पाठवले जातात तसेच विदेशातील दलाल सुद्धा त्यांच्याकडून फळे विकत घेतात. वासनकर अहमदाबाद, दिल्ली, पुणे, व केरळच्या  बाजारात नागपुरी संत्राचा पुरवठा करतात. सोबतच बांगलादेशाच्या बाजारात सुद्धा त्यांचे संत्रे चांगल्या भावाने विकल्या जातात. दरम्यान संशोधन केंद्राच्या संपर्कानंतर उत्पादन व लाभ वर्तमानमध्ये वासनकारांना फक्त एकाच पिकापासून १० लाखांचा वार्षिक लाभ होत आहे.  याचे केंद्राद्वारे विकसित केलेल्या रोगमुक्त एलिमो, मुलावृत्ताला  देताता. ते म्हणाले की, केंद्राला जुळण्याआधी  त्यांचे उत्पन्न फक्त १ लाखच्या जवळ होते. तसेच झाडांची  स्थिती पण हालाखीचीच होती आणि रोगांनी संक्रमित होती.

दरम्यान  बागेतील एक झाड हे मरण्याच्या अवस्थेत आहे, तेव्हा त्याला एलिमोच्या झाडासोबत जोडून टाकले आणि आता ते झाड स्वस्थ मुलवृंत्ताच्या परिणामे गुणवत्तेत फळे द्यायला लागले आहे.  वासनकरांना लिंबूवर्गीय उत्पादनातील अडचणींबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, उत्पादनातील प्रमुख बाधा ही वायवारचा प्रकोप आहे. जे लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनातील घटाचे प्रमुख कारण आहे. भूजल पातळी कमी होणे, तसेच सातपुढा पर्वतात पाण्याचा स्तर अतिशय कमी असल्याने १७५ फूटपर्यंत खोल  असलेल्या बोरवेलमध्ये देखील पाणी येणे कठीण आहे.

पुरस्कार व ओळख - प्राकृतिक परिस्थिती अनियमित हवामान , किटक, रोग, बाजारभावातील चढ-उतार इत्यादी नुकसान असूनही वासनकर अमरावती जिल्ह्यातील प्रगतीशील लिंबूवर्गीय फळांचे उत्पादक शेतकऱ्यांच्या रुपात आपली उत्कृष्टा सिद्ध करण्यात यशस्वी झाले आहेत. कृषी व पशुपालनाच्या राज्य विभागाद्वारे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय शेतकरी  बैठकीत जून २००४ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे राष्ट्रीय बैठकित सुद्धा लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित केले गेले आहे.

लेखक

संगीता भट्टाचार्य,

डॉ. आर,के सोनकर

श्री. पराग शा. पाखमोडे

केंद्रीय लिंबूवर्गीय फळवर्गीय फळ संशोधन संस्था

नागपूर

English Summary: Orange farming has increased farmers' income, read the success story in Amravati
Published on: 30 September 2020, 06:16 IST