Success Stories

शेतकरी हा खूप कष्ट करून शेती फुलवतो, त्याला नशिबाने आणि निसर्गाने साथ दिली तर तो कोणालाही ऐकत नाही. आता सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याने दूध व्यवसायातून मोठी प्रगती केली आहे. ते दूध आणि शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचा उत्पन्न घेत आहेत.

Updated on 28 November, 2022 9:50 AM IST

शेतकरी हा खूप कष्ट करून शेती फुलवतो, त्याला नशिबाने आणि निसर्गाने साथ दिली तर तो कोणालाही ऐकत नाही. आता सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याने दूध व्यवसायातून मोठी प्रगती केली आहे. ते दूध आणि शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचा उत्पन्न घेत आहेत.

यामुळे या शेतकऱ्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. प्रकाश इमडे (Prakash Imday) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी या उत्पन्नातून एक कोटी रुपयांचा बंगला देखील बांधला आहे. त्यावर त्यांनी गाईचे आणि किटलीचे प्रतिकृती तयार केली आहे.

त्यांनी चार एकर शेतीत दोन एकरमध्ये मुक्त गोठा तयार केला आहे. तसेच दोन एकरमध्ये त्यांनी गायींसाठी हिरवी वैरण लावलेली आहे. त्यांनी 1998 साली एका गाईवर या व्यवसायाला सुरुवात केला होता. या एकाच गायीपासून त्यांनी आज जवळपास 150 गायी वाढवल्या आहेत.

राजू शेट्टी यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण, चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

त्यांनी कधीच गाई विकली नाही. यामुळे त्यांच्याकडे 150 गाई आहेत. त्यांच्या मुक्त गोठ्यात नियोजनबद्ध पद्धतीने चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य याची काळजी घेतली जाते. सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावातील प्रकाश इमडे हे अल्पभूधारक शेतकरी. मात्र तरी देखील ते यशस्वी झाले आहेत. प्रकाश इमडे हे रोज एक हजार लिटर दूध डेअरीला देत आहेत.

नेमाडेंनी उभारलेला हा व्यवसाय पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यावसायिक इथे येऊन भेट देतात. त्यांना प्रकाशबापू सर्व पद्धतीचे मार्गदर्शन करत असतात. बापूंची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राबत असतात. बापूंची सून एकटी 55 गायींच्या धारा काढते.

ब्रेकिंग! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक

आता गोठ्यात चार मजूर कामाला असले तरी बापूंचे कुटुंब देखील या गोठ्यात राबत असते. शेणातूनही दरवर्षी 12 लाख रुपये मिळतात. आता बापूंनी गायी वाढवण्यापेक्षा कमी गायींपासून जास्त दुधासाठीचे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. या गायी 40 लिटरपर्यंत दूध देत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:
'आमचे 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहेत'
बहुराष्ट्रीय कंपन्याच्या मुठीतूनच कृषी क्षेत्राची डिजीटलायझेशन कडे वाटचाल, राजू शेट्टी यांची एक माहिती एकदा वाचाच
विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ, अमरसिंह कदम यांचा महावितरणला इशारा

English Summary: One crore bungalow built milk dung, profit crore
Published on: 28 November 2022, 09:41 IST