ग्रामीण भागात राहणारे कित्येकजण आपलं शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरी करण्यास जातात. मात्र असा एक काळ आला की तेंव्हा बऱ्याच जणांना शहर सोडून गावी यावे लागले. कोरोना काळात कित्येक शहरी रहिवास्यांनी गावी जाणं पसंत केलं. कोरोना महामारीच्या काळात देशात चालणाऱ्या सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती.
त्यामुळे त्यावेळी घरून काम करणे अनिवार्य झाले होते. त्याचवेळी पुण्यात राहणारे अभियंता तुकाराम सोनवणे आणि त्यांची पत्नी सोनाली वेलजाली यांनाही घरून काम करावे लागले होते. घरून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. ते जवळजवळ 14 वर्षांनंतर आपल्या गावी अंदरसुलला परतत होते.
एक आठवडाभर घरी राहिल्यानंतर, त्यांच्या असं लक्षात आले की, त्यांच्या गावात फारसा बदल झालेला नाही. शेतकरी अजूनही चांगले उत्पादन घेण्यासाठी धडपडत आहेत. थोडेफार यांत्रिकीकरण झाले असेल मात्र उर्वरित समाज हा शेतीच्या कामासाठी गुरेढोरे आणि मजुरांवरच अवलंबून आहे. मात्र त्यांचं गावी येणं शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे.
"मशागत असो किंवा पेरणी तसेच कीटकनाशकांची फवारणी ही प्रक्रिया सामान्यतः मजुरांच्या मदतीने व हाताने केली जाणारी प्रक्रिया आहे. शिवाय बैलांच्या तुटवड्याचा प्रश्न कारण त्यांची देखभाल करणे खूप महागडे असते. अर्धा एकर किंवा 1 एकर जमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी यामुळे सर्वात जास्त त्रस्त आहेत. शिवाय यापैकी कोणत्याही प्रक्रियेत आठवडाभराचा जरी विलंब झाला तर याचा थेट कापणीच्या वेळेवर परिणाम होतो परिणामी पिकाच्या विक्रीवरदेखील याचा परिणाम होतो.
Petrol, Diesel Price:पेट्रोल डिझेलबाबत ठाकरे सरकारचा ढोंगीपणा उघड;अजूनही किमती आहे तशाच
त्यांनी जर आठवडाभर उशिराने त्यांचे उत्पादन विकले तर त्यांना चांगला नफादेखील मिळत नाही. यावर तोडगा म्हणून आम्ही इलेक्ट्रिक बैल बनवण्याचा निर्णय घेतला आहे". असे अभियंता तुकाराम सोनवणे आणि त्यांची पत्नी सोनाली वेलजाली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे ते असेही म्हटले की , "अशा काही प्रक्रिया आहेत ज्यात फक्त बैलाचा वापर केला जाऊ शकतो.
कारण ट्रॅक्टर अशा कामासाठी खूप मोठा आहे. उदाहरण देयचं म्हटलं तर, बियाणे पेरण्याचा उद्देश बैलामार्फत पूर्ण केला जाऊ शकतो, कारण वृक्षारोपणातील अंतर कमी करता येते. आणि जर ट्रॅक्टर वापरला तर यातून पेरणीचे क्षेत्र कमी होते.”
असा तयार झाला इलेक्ट्रिक बैल
मित्राच्या फॅब्रिकेशन वर्कशॉपच्या मदतीने त्यांनी हे यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचे तुकाराम सांगतात. या यंत्राची रचना करण्यासाठी जी काही साधने म्हणजेच इंजिन व इतर साहित्य बाहेरून आणण्यात आले होते. "आम्ही शेतकऱ्यांच्या समस्येवर महिनोनमहिने चर्चा केली. आणि त्यानंतर सोनालीने ठरवले की,
हंगामातील माती तसेच पिकाच्या विविध प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या गरजा बदलत असतात.
त्यामुळे आवश्यकतेनुसार यंत्र बनवले पाहिजे. त्यांनी इंजिनवर चालणारे उपकरण तयार केले जे नांगरणी वगळता सर्व काम करते. “एकदा नांगरणीनंतर शेत तयार झाले आणि पहिला पाऊस पडला की, पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व देखभालीची कामे ही यंत्रे करू शकतात,” असं त्यांनी सांगितलं आहे.
शेतात ओढत नेऊन बिबट्याने घेतला शेतमजुराचा बळी; शेतकरीराजांनो काळजी घ्या
मशीनबद्दल थोडक्यात
हा इलेक्ट्रिक बुल एकदा पूर्ण चार्ज झाला की, चार तास काम करतो. सोनाली यांनी पुढे असेही म्हटले आहे की, "या उत्पादनाची फारशी चर्चा किंवा जाहिरात आम्ही केलेली नाही. शिवाय महाराष्ट्र, आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यातील शेतकरी आणि कंपन्यांनी आमच्याकडून या यंत्राबाबत चौकशी केली आहे".
हे प्रभावी मशीन तयार करण्यासाठी या दोघांनी कित्येक रात्र आणि दिवस घालवले आहेत. त्यांनी घेतलेल्या मशीनवरील कष्ट कामी आले आहे. त्याच प्रत्येक्ष उदाहरण म्हणजे, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सुभाष चव्हाण हे होय. त्यांनी या उपकरणाचा ट्रायल घेतला. ते म्हणतात, “शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे यंत्र कार्यक्षम आहे.
मी सोयाबीन पिकासाठी याचा वापर केला आणि काही तासांत हे काम पूर्ण झाले. यावरून त्याची कार्यक्षमता दिसून येते. जर मशीन नसती तर मी सुमारे १२ मजुरांच्या मदतीने हे काम तीन दिवसांत पार पाडले असते शिवाय या संपूर्ण गोष्टीसाठी मला सुमारे ५,००० रुपये इतका खर्च आला असता.”
महत्वाच्या बातम्या:
रेश्मा नामक म्हशीची कमाल; ठरली देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस
Published on: 24 May 2022, 03:21 IST