शेतीत काळानुसार अनेक बदल होत गेले आहेत. यामुळे सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी आता ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीची आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कृषीविषयक संस्था ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे (Agriculture Development Trust) अटल इनक्युबेशन सेंटर, कृषी विज्ञान केंद्र एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत.
यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर चंद्रा, ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. ३) या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
तसेच ‘कृषिक २०२३ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनही या प्रसंगी होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन १९ ते २२ जानेवारी दरम्यान खुले असेल. यामध्ये ३ ते १८ जानेवारी दरम्यान स्टार्टअप इतर नवसंशोधक असतील त्यांच्यासाठी वेबिनारचे आयोजन केलेले आहे.
शेतकऱ्यांचे 100 टन उसाचे उत्पन्न बघून शरद पवारांनी लावला थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फोन आणि...
यामध्ये शेतकऱ्यांना व्हर्टिकल फार्मिंग, अर्बन फार्मिंग, रोबोटचा शेतीतील वापर, दुग्ध व फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी उपाययोजना, दूध व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, नैसर्गिक शेतीचे धडे दिले जाणार आहेत.
यावेळी अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी नीलेश नलावडे म्हणाले, बदलते हवामान, शेतीसाठी वाढलेला खर्च, अत्यल्प उत्पन्नामुळे न परवडणारी शेती. अशा कारणांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करणे ही आता शेतकऱ्यांची गरज आहे.
उगीच कोणी शेतकरीराजा म्हणत नाही!! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध, बघणारे गेलेत कोमात
शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेती अधिक किफायतशीर होईल, भारतात मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्डच्या मदतीने ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, ऑक्सफर्डचे डॉ. अजित जावकर व मायक्रोसॉफ्टचे रणवीर चंद्रा यांचे यात मोलाचे योगदान आहे.
बारामतीत सुरू होणारे केंद्र हे वॉशिंग्टन नंतर जगातील केवळ दुसरे संशोधन केंद्र ठरणार आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कृषी क्षेत्रासाठी हा पथदर्शी प्रकल्प म्हणून नोंदवला जाईल, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
समृद्धी महामार्गाची खरी कहाणी! आलिशान गाड्या, कोट्यावधीचे बंगले आणि बक्कळ पैसा, शेतकरी मालामाल
जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःलाच जमिनीत गाडून घेतले, शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
Published on: 03 January 2023, 04:15 IST