शेतीमध्ये दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सध्या चार पैसे मिळू लागले आहेत. सध्या शेतकरी कमी जमिनीमध्ये आंतरपीक घेऊन उत्पादन वाढवत आहेत. आता जळगाव (Jalgon)जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी मिलिंद निकम याने शेतीत आंतरपीकाचा प्रयोग केला आहे. उन्हाळ्यात कलिंगडाला (watermelon) मोठी मागणी असते.
चोपडा येथील तरुण शेतकरी मिलिंद निकम (Milind Nikam) याने हिवाळ्यात कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. यासाठी या शेतकऱ्याने सप्टेंबर महिन्यात केळीची (Banana Farming) लागवड केल्यानंतर कलिंगडाची लागवड केली. यामधून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. या आंतरपीक पध्दतीमुळे त्यांना दुहेरी फायदा होत आहे.
यामध्ये त्यांना कलिंगडाला सरासरी 19 रुपये दर मिळाला तरी खर्च वजा करून सहा लाख रुपयांपर्यंत एकरी नफा त्यांना झाला आहे. यामध्ये एका पिकाला भाव कमी मिळाला तरी दुसरे पीक आधार देते. असे त्यांनी सांगितले. याचे योग्य नियोजन केले तर याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये मशागतीचा खर्चही दुहेरी पिकामुळे वाचतो.
"मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन शेट्टींचा पवारांना टोला"
यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आंतरपिकाच्या माध्यमातून फायदा करून घ्यावा, असं आवाहन मिलिंद निकम या युवा शेतकऱ्याने केले आहे. त्यांनी लागवड केलेली केळी देखील जोमात आली आहे. त्याचे देखील चांगले पैसे मिळणार आहेत. यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
मुख्यमंत्रीसाहेब, शेतीला किमान दिवसा लाइट द्या हो! शेतकऱ्यांची भावनिक साद
दरम्यान, आता हळूहळू उन्हाळा जवळ येत असून कलिंगडाची मागणी देखील वाढू लागली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची गरज आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा शेती करण्यासाठी सक्षम बनणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
रिपब्लिक ऑफ कोसोवोने नवी दिल्ली येथे पहिले व्यावसायिक वित्त कार्यालय उघडले
'17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार'
आता ऊस आणि द्राक्षला ड्रॅगन फ्रूटचा पर्याय, ड्रॅगन फ्रूट फार्मिंग'ने आणली क्रांती..
Published on: 04 November 2022, 09:52 IST