आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या कल शेतीकडे ओळत असल्याचे दिसत आहे, कारण शेतीची अनेक तंत्रे विकसित झाली असून आपल्याला शेतीतून चांगले उत्पन्न भेटत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्धल सांगणार आहोत जो स्वदेशी यंत्र वावरून परदेशी भाजीपाला पिकवत आहेतउत्तर प्रदेश मधील मेरठ येथे काका पुतणे आयटी क्षेत्रात २०१७ पर्यंत काम करत होते पण त्यांना काही दिवसाने आयटी क्षेत्रात काम करण्याचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी गावाकडे जाऊन शेती करण्याचा मार्ग अवलंबला, त्यासाठी त्या दोघांनी मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीची नोकरी सोडली.
२०१७ मध्ये काका पुतणे यांनी नोकरी सोडून डोक्याचा वापर केला आणि शेती करायला चालू केले, त्या दोघांनी शेतीमध्ये परदेशी भाज्या लावल्या. त्यांनी ज्या परदेशी भाज्या पिकवल्या आहेत त्या भाज्या दिल्लीत जागोजागी मार्केटमध्ये विकत आहेत, काका पुतणे याना शेतीमधून एवढा नफा भेटत आहे की त्यांनी तेथील लोकांना सुद्धा त्यांच्या शेतीत रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
हेही वाचा:चक्क ही महिला नर्सरी मधील रोपे विकून वर्षाला करते 3 कोटींची उलाढाल
शेतीमध्ये काका पुतण्याने टोमॅटो, शिमला मिरची , काकडी, पालक, वटाने तसेच भेंडीसारखी भाज्यांची लागवड केली आहे. कोणत्याही केमिकल्स चा वापर न करता त्यांनी सेंद्रिय प्रकारची शेती केली आहे. तसेच त्यांनी परदेशी भाज्यांमध्ये चिनी कॅव्हीज, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, लेमन ग्रास, पार्सले अशा भाज्यांची लागवड केली आहे. तसेच त्यांचे पॉलिहाऊस एवढे सुंदर आहे की बाहेरची लोक सुद्धा ते पाहायला येतात.
काका पुतणे यांनी मोदींना असे आव्हान केले आहे की शेतकऱ्यांना शिकण्यासाठी एक अभियान तयार केले पाहिजे म्हणजे आपल्या देशातील शेतकरी जेवढा सुरक्षित तेवढे आपल्या लोकांना फायदा आहे. उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांसाठी चुलते पुतणे एक आदर्श बनले आहेत, तसेच तेथील काही शेतकरी त्यांच्याकडे या प्रकारची शेती कशी करतात यासाठी प्रशिक्षण सुद्धा घ्यायला येतात.
Published on: 08 July 2021, 08:58 IST