Success Stories

गेल्या अनेक वर्षांपासून शेती परवडत नाही असा गैरसमज लोकांच्या मनात तयार झाला आहे. मात्र जर शेती क्षेत्रात काळाच्या ओघात परिवर्तन घडवून आणले तसेच आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली तर काळी आई कधीच उपाशी झोपू देणार नाही एवढे नक्की. याची प्रचिती समोर आली आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातून, कोरोनाच्या काळात अनेक लोकांचे रोजगार गेलेत. रत्नागिरी तालुक्याच्या मौजे वेतोशी येथे राहणाऱ्या सूनाद सदानंद निंबरे याची देखील कोरोणाच्या काळात नोकरी गेली.

Updated on 11 March, 2022 11:43 AM IST

गेल्या अनेक वर्षांपासून शेती परवडत नाही असा गैरसमज लोकांच्या मनात तयार झाला आहे. मात्र जर शेती क्षेत्रात काळाच्या ओघात परिवर्तन घडवून आणले तसेच आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली तर काळी आई कधीच उपाशी झोपू देणार नाही एवढे नक्की. याची प्रचिती समोर आली आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातून, कोरोनाच्या काळात अनेक लोकांचे रोजगार गेलेत. रत्नागिरी तालुक्याच्या मौजे वेतोशी येथे राहणाऱ्या सूनाद सदानंद निंबरे याची देखील कोरोणाच्या काळात नोकरी गेली.

पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर निंबरे नोकरी करण्यासाठी आपल्या गावाहून मायानगरी मुंबईला स्थलांतरित झाले. परंतु दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगात आलेली एक महामारी निंबरे साठी मोठी घातक ठरली या महामार्ग च्या काळात निंबरे यांची नोकरी गेली. नोकरी गेल्याने निंबरे यांना पुन्हा एकदा आपल्या गावाकडे मार्गस्थ व्हावे लागले. निंबरे स्वभावाने खूपचं जिद्दी असल्याने त्यामुळे नोकरी गेल्याचे दुःख बाळगण्याऐवजी त्यांनी यावर मार्ग काढण्यासाठी आपल्या वडिलोपार्जित शेतीत घाम गाळण्याची तयारी दाखवली. शेतकरी निंबरे आता आपल्या शेतात बारामाही पिकांची लागवड करत असतात.

सुरुवातीला पावसाळ्यात पारंपारिक पद्धतीने भात पिकाची लागवड ही ठरलेलीच असते, भात पिकाची काढणी झाल्यानंतर शेतात निंबरे वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. मुळा, माठ, मोहरी, वांगी, भेंडी, कारली, मिरची इत्यादी भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड निंबरे आपल्या शेतात करत असतात. त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत आतापर्यंत केवळ पावसाळी हंगामात भात पिकाची लागवड केली जात असे भात पिकाची काढणी झाल्यानंतर त्यांच्या एक हेक्‍टर क्षेत्रात कोणत्या पिकाची लागवड होत नसे ते क्षेत्र तसेच राहत असे. त्यामुळे निंबरे यांनी पावसाळ्यात भात पिकाची काढणी झाल्यानंतर भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांना यातून फायदा देखील मिळत आहे, शेतीतून मिळत असलेल्या उत्पादनामुळे गदगद झालेले सुनाद आता नोकरीच्या मागे न धावता काळी आईचीच सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निंबरे यांनी कला क्षेत्रातून पदवीचे शिक्षण प्राप्त केले आहे. पदवीधर निंबरे आता आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार आहेत.

हेही वाचा:-

गजब! फक्त वीस गुंठ्यात 'या' शेतकऱ्याने मिरची लागवड करून कमविले सात लाख रुपये

तिनं करून दाखवलं! वडिलांची शेती सांभाळत उमा करतेय लाखोंची उलाढाल

मानलं अर्जुना! भंगार उपयोगात आणून आठवीच्या विद्यार्थ्याने तयार केली नवी कोरी गाडी

English Summary: Killed by job but rescued by black mother! Unemployed youth are now earning millions from agriculture
Published on: 11 March 2022, 11:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)