अनेक तरुण हे घरी शेती असताना देखील नोकरी करतात. मात्र शेतीमध्ये योग्य व्यवस्थापन केले तर वर्षांच्या पगाराचे पैसे तुम्ही शेतीमधून काही दिवसांमध्येच कमवू शकता. आता श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील एका तरुणाने योग्य नियोजन करत अवघ्या दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. आता हा तरुण लाखो रुपये कमवत आहे.
त्याने केवळ सात महिन्याच्या कालावधीत ३० टन डाळिंबाचे विक्रमी उत्पादन चम्हणजे १८ लाख रुपये कमावले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. अनेक शेतकरी त्यांची शेती बघायला आवर्जून येत आहेत. या डाळिंबाला कलकत्ता येथील व्यापाऱ्याने ७० ते १०० रू प्रती किलो बाजार भाव दिला आहे. नवनाथ दिगंबर विधाते असे या तरुणाचे नाव आहे.
या डाळींबाची गुणवत्ता देखील चांगली होती. या डाळिंबाला औषध, खते तसेच मजुरीसाठी अवघा २ लाख रुपये खर्च आला. त्यांना कुटुंबातील सदस्यांची मोलाची मदत मिळाली. अनेक कामे ते घरच्या घरची करतात. यामध्ये त्यांचे अजून पैसे वाचतात. सध्या डाळींबाची शेती सुद्धा धोक्यात आली आहे, अनेक प्रकारचे रोग यामध्ये आले आहेत. मात्र नवनाथ यांनी आपली बाग टिकवली आहे.
'FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही'
विधाते दीड एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली होती. चालू वर्षी दीड एकरावरील डाळिंबाच्या एक झाडाला सरासरी ४० ते ४५ किलो डाळिंबाचे उत्पन्न निघत एकूण ७०० झाडांवर ३० टन डाळिंबाचे विक्रमी उत्पन्न निघाले. सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढून टाकल्या आहेत. यामुळे सध्या डाळींबाला चांगला दर मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी संपावर, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध..
सध्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. पर्यायाने अनेकांनी शहर सोडून गावचा रस्ता धरला. यामध्ये अनेकांनी संधीचे सोन करत शेती केली आणि त्यांना आता यामधुन चांगले पैसे मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! पीक नुकसानीचे 1106 कोटी आले; उद्यापासून बँक खात्यांत होणार जमा
पेरु च्या शेतीतून नशीब बदलले, शेटफळचा पेरु पोहोचला केरळच्या बाजारात, दोन एकरात 14 लाखांचे उत्पन्न
१०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार, FRP बाबत महत्वपूर्ण माहिती
Published on: 21 September 2022, 05:39 IST