Success Stories

दर्जावान पीक येण्यासाठी अनेक कृषीतज्ञ पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत असतात. आता मात्र अनेक शेतकरी बंधू पीक पद्धतीत बदल करून चांगला नफा मिळवत आहेत.

Updated on 13 May, 2022 4:43 PM IST

Nanded : सध्या शेतकरी बंधू पारंपरिक शेती आणि सोबतच अत्याधुनिक पद्धतीचादेखील नाविन्यपूर्ण वापर करून शेती करत आहे. पारंपरिक पीक पध्दतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होताना दिसत आहे. त्यामुळे दर्जावान पीक येण्यासाठी अनेक कृषीतज्ञ पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत असतात. आता मात्र अनेक शेतकरी बंधू पीक पद्धतीत बदल करून चांगला नफा मिळवत आहेत.

शेतकरी उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवत असतो. असाच एक प्रयोग नांदेड जिल्ह्यातील इकळीमोर येथील एका शेतकऱ्याने केला आणि त्यात त्यांना यश देखील मिळाले. इकळीमोर येथील शेतकरी गणपत मोरे यांनी वर्षभरात एक नाही दोन नाही तर तर तब्बल तीन पीके घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे. योग्य पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आणि मुबलक पाणी आवश्यक असते.

या सगळ्याचा चांगला योग जुळून आल्याने गणपत मोरे यांना दर्जावान पीक हाती लागले. गणपत मोरे यांनी हंगमानुसार पीक पद्धतीत बदल केला आणि तीन पिकांचे उत्पादन घेतले मात्र ते ही सरासरीपेक्षा अधिक उत्पादन घेतले. गणपत मोरे यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी हा प्रयोग कुणाच्या मार्गदर्शानाशिवाय यशस्वी करून दाखवला आहे.

हंगामाच्या सुरवातीला गणपत मोरे यांनी सोयाबीन त्यानंतर हरभरा आणि आता तीळाचे पीक घेतले आहे. पूर्वनियोजन तसेच पाण्याचा योग्य पुरवठा आणि वेळोवेळी मशागतीची कामे केल्याने हे शक्य झाले आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि त्यात होणारे अमाप नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त आहे. मात्र अशातच गणपत मोरे यांनी जो अभिनव उपक्रम केला आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जर शेतीमध्ये अधिकचा खर्च करता येणे शक्य नसेल तर पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. बारमाही एकच पीक घेतले तर जमिनीचा पोत खराब होतो परिणामी उत्पादनात घट होते. या सर्व बाबींचा अनुभव गणपत मोरे यांना आला होता. त्यामुळेच पाण्याची उपलब्धता पाहता त्यांनी हा अभिनव उपक्रम केला. त्यातून त्यांना अधिकचे उत्पादनही त्यांना मिळाले आहे.

शेतकऱ्यांचे तीळ पिकाकडे तसे दुर्लक्ष असते.मात्र गणपत मोरे यांनी अंतिम टप्प्यात तीळाची निवड केली. पूर्वनियोजन, योग्य मशागत तसेच पाण्याचे नियोजन केल्याने त्यांना एकरी 10 क्विंटल उत्पन्न पदरी पडले आहे. शिवाय बाजारात तीळाला चांगला भाव असल्याने त्यांना सर्वात जास्त तीळातून फायदा झाला.

महत्वाच्या बातम्या:
शेतकरी संतापला: थेट तलाठी कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
बळीराजाचा सन्मान..! महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन
Cabinet meeting : कॅबिनेटची बैठक सुरू असताना बत्तीगुल, मुख्यमंत्र्यांशी संपर्क तुटला; आणि पुढे

English Summary: Innovative experiment of Nanded farmer successful; 'Yes' change in cropping pattern
Published on: 13 May 2022, 04:43 IST