Success Stories

शेती व्यवसायात अलीकडे आमूलाग्र बदल केले जात आहेत. यामध्ये प्रमुख बदल पीक पद्धतीचा आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही एका शेतकऱ्याने पीक पद्धतीत मोठा बदल केला असून चक्क बिया नसलेल्या टरबुज पिकाची अन पिवळ्या खरबूज पिकाची लागवड केली आहे.

Updated on 27 April, 2022 11:26 AM IST

शेती व्यवसायात अलीकडे आमूलाग्र बदल केले जात आहेत. यामध्ये प्रमुख बदल पीक पद्धतीचा आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही एका शेतकऱ्याने पीक पद्धतीत मोठा बदल केला असून चक्क बिया नसलेल्या टरबुज पिकाची अन पिवळ्या खरबूज पिकाची लागवड केली आहे.

या अवलिया शेतकऱ्याने शेतीमध्ये केलेला हा बदल पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय आहे एवढेच नाही तर या अवलियाचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग बघण्यासाठी विदेशी संशोधकांनी देखील बांधावर हजेरी लावली आहे. ही निश्चितच मालेगावकरांसाठी नव्हे-नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. एवढेच नाही तर यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला असल्याच्या भावना आता पंचक्रोशीत झळकू लागल्या आहेत.

Important News :-

Crop Damage : बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका; केव्हा उबजारी येईल बळीराजा

कोण म्हणतं शेती तोट्याची? अहमदनगर मधील शेतकऱ्यांनी ढेमसे लागवड करून चार महिन्यात केली 60 लाखांची उलाढाल

खरं पाहता कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थात कसमादे हा भाग डाळिंब शेती साठी विशेष ओळखला जातो. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, सातमाने, कोठरे इत्यादी गावांमध्ये डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात होत असून या गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पंचक्रोशीत आपले एक नवीन नाव कोरले आहे. असे असले तरी पंचक्रोशीतील शेतकरी डाळिंब शेतीबरोबरच शेती व्यवसायात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत आले आहेत.

यामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देखील प्राप्त होत आहे. दाभाडी येथील महेंद्र निकम यांनी देखील आधुनिकतेची कास धरत आणि शेतीव्यवसायात जरा हटके विचार करीत बिया नसलेल्या कलिंगड वाणाची अर्थात सीडलेस हॅम्पि होम या कलिंगड वाणाची लागवड केली आहे.

या शेतकऱ्याने लागवड केलेल्या या कलिंगडच्या वाणापासून त्यांना चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. याशिवाय त्यांनी पिवळ्या रंगाच्या खरबुजाची देखील यशस्वी लागवड केली आहे. निकम यांनी सांगितले की, कलिंगड व खरबूज पिकाला चांगला बाजार मिळाला तर निश्चितच यातून त्यांना लाखों रुपयांच्या उत्पन्नाची आशा आहे.

विशेष म्हणजे महेंद्र यांनी शेतीमध्ये आत्मसात केलेला हा बदल बघण्यासाठी कृषी संशोधक आणि त्यांच्या बांधावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महेंद्र यांच्याकडून  लागवडीपासून ते काढणीपर्यंत कशा पद्धतीने नियोजन आखले याविषयी सविस्तर जाणून घेतले.

यामुळे निश्चितच डाळिंब नगरी म्हणुन विख्यात असलेल्या कसमादे पट्ट्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. महेंद्र निकम यांनी सांगितले की, वाढत्या तापमानामुळे कलिंगड पिकाला आता चांगला बाजार मिळणार असून सीडलेस कलिंगड लोकांसाठी विशेष आकर्षण सिद्ध होऊ शकते तसेच पिवळ्या रंगाचे खरबूज देखील पंचक्रोशीत विशेष पसंत केले जाईल आणि साहजिकच त्यांना यातून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे.

English Summary: Innovative experiment of Malegaon farmers Cultivation of seedless watermelon and presence of foreign visitors on the dam
Published on: 27 April 2022, 11:26 IST