Success Stories

वाळवा येथील धैर्यशील पाटील या अभियंता तरुण शेतकऱ्याने अभ्यास व शिकण्याच्या धडपडीतून उसाची प्रयोगशील शेती सुरू केली आहे. त्यातून अलीकडील काही वर्षांत ऊस उत्पादनाचा आलेख एकरी ८५ टनांवरून ११३ टनांपर्यंत उंचावला आहे. अनेक वर्षांपासून पिकाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याची नोंदवही जपली आहे.

Updated on 19 February, 2023 12:18 PM IST

वाळवा येथील धैर्यशील पाटील या अभियंता तरुण शेतकऱ्याने अभ्यास व शिकण्याच्या धडपडीतून उसाची प्रयोगशील शेती सुरू केली आहे. त्यातून अलीकडील काही वर्षांत ऊस उत्पादनाचा आलेख एकरी ८५ टनांवरून ११३ टनांपर्यंत उंचावला आहे. अनेक वर्षांपासून पिकाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याची नोंदवही जपली आहे.

सांगली जिल्ह्यात इस्लामपुर या प्रमुख शहराच्य पूर्वेला साखराळे गावचे शिवार लागते, याच ठिकाणी राजारामबापू सहकारी साखर कारखाना आहे. गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील धैर्यशील पाटील यांच्या घरची चार एकर शेती आहे. सन २०१६ मध्ये बीई मेकॅनिकलची पदवी घेतल्यानंतर धैर्यशील यांनी पूर्णवेळ शेतीची जबाबदारी घेतली, ऊस हे त्यांचे प्रमुख पीक असून, दरवर्षी दोन ते तीन एकर क्षेत्र या पिकाखाली असते.

शेती प्रयोगशील करण्यासाठी धडपड करणाऱ्या गावातील तरुणांनी एकत्र येत शिवार फाउंडेशनची स्थापना केली. त्याअंतर्गत माती परीक्षण करणे, ऊस पिकातील विविध अडचणींवर चर्चा करणे, त्यासाठी अनुभवी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देणे, चर्चासत्रे आयोजित करणे असे उपक्रम सुरू केले आहेत, याच फौंडेशनचा भाग असलेल्या धैर्यशील यांनी आपल्या शेतीतही नवे प्रयोग व सुधारणा सुरू केल्या. माझी शेती माझा विकास ही टॅगलाइन घेऊन २०१८ पासून एकात्मिक शाश्वत शेतीला सुरुवात केली. आपली शेती प्रगत झाली, पिकली, तरच आर्थिक सुबत्ता येऊ शकते हे लक्षात घेतले.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, ३१ मार्चपर्यंत गव्हाच्या राखीव किंमतीत आणखी कपात

धैर्यशील को ८६०३२ या वाणाची आडसाली पद्धतीने लागवड करतात. ऊस घेण्यापूर्वी त्या क्षेत्रात सोयाबीन, हरभरा अशी द्विदलवर्गीय पिके घेतली जातात. जमिनीची मशागत करताना साखर कारखान्याकडील कंपोस्ट खत एकरी २० टन व ४ टन मळीची राख यांचा वापर होतो. पूर्वी साडेचार फूट सरी पद्धतीचा वापर व्हायचा. मागील वर्षी पाच बाय दीड फूट व सहा बाय दीड फूट अशा पद्धतीचा वापर केला.

एक डोळा कांडीची लावण होते. दर चार सऱ्यांनंतर पाचवी सरी दाट लावण्यात येते. जेणेकरून तुटाळी भरून येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. उत्पादन वाढीसाठी शुद्ध वेणे महत्त्वाचे आहे हे ओळखून कोइमतूर येथील संस्थेतून रोपे आणून आपल्या शेतात वाढवली आहेत. दरवर्षी माती परीक्षण केले जाते. त्यानुसारच अन्नद्रव्यांचा वापर होतो. प्रातिनिधिक नियोजन सांगायचे, तर लागवडीनंतर ३० दिवसांनी २०-२०-०-१३. दोन बॅग्ज, युरिया एक बॅग, एसओपी २० किलो ही खते चर काढून मातीआड केली जातात.

साठाव्या दिवशी १४-३५-३५ दोन बॅग्ज, अमोनिअम सल्फेट एक बॅग, पॉलिसल्फेट २५ किलो मातीआड केले जाते. ८० व्या दिवशी २४-२४० दोन बॅग्ज, अमोनिअम सल्फेट एक बॅग, पोटॅशिअम सोनाईट २५ किलो देऊन बाळभरणी होते. ११० दिवसांनी मुख्य भरणी होते. त्या वेळी ९-२४-२४ दोन बॅग्ज, युरिया एक बॅग, एसओपी २५ किलो अशी मात्रा देण्यात येते.

26 किलोच्या माशाने मच्छिमार बनवला लखपती, या कारणाने माशाला लागली मोठी बोली..

धैर्यशील यांनी एकरी उत्पादनाकडे लक्ष देण्याबरोबरच जमिनीच्या सुपीकतेवरही तेवढाच भर दिला आहे. ते म्हणतात, की एकरी १०० टन ऊस उत्पादन व ३ लाख रुपये एकूण उत्पन्न मिळवले, तर त्यातील १० टक्क्यांच्या आसपास रक्कम जमीन सुपीक करण्यावर खर्च करतो.

यात जिवाणू खतांचा वापर असतोच. शिवाय खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी गांडूळ खताचाही वापर होतो ८ वर्षांपासून एकदाही पाचट पेटविलेले नाही. फेरपालट म्हणून दरवर्षी एका एकरात सोयाबीन व त्यानंतर हरभरा ही पिके घेतली जातात. जमिनीतील सेंद्रिय कर्ब १.८ टक्का असल्याचे धैर्यशील सांगतात.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो दुग्ध व्यवसायातून पैसे कमावण्याची उत्तम संधी, नाबार्डकडून मिळतंय अनुदान
शिमला मिरचीने बदलले शेतकऱ्यांचे नशीब, लाखोंचा नफा
खरेदी न झाल्याने राज्यातील शेतकरी नाराज, नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी..

English Summary: Increased sugarcane production graph, from 85 tonnes to 113 tonnes per acre
Published on: 19 February 2023, 12:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)