पीक पद्धतीत बदल करून अगदी थोड्याशा क्षेत्रातूनही अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते. शेतीतून अधिक पैसा कमवण्यासाठी शेतजमीन जास्तच पाहिजे असा काही विषय नाही. जर योग्य नियोजन केले गेले तर कमी क्षेत्रातूनही अधिकचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करून हिंगोली जिल्ह्यातील एक अवलिया शेतकरी केवळ दहा गुंठे क्षेत्रात लाखो रुपयांचे उत्पन्न कमी आहे. आज आपण या अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.
जिल्ह्यातील मौजे डोंगरकडा येथील एक प्रयोगशिल शेतकरी पंकज आडकिने फुलशेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त करीत आहेत. विशेष म्हणजे हा अवलिया शेतकरी केवळ दहा गुंठे क्षेत्रात जरबरा लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पिकातून कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत असल्याने एकीकडे नवयुवक शेतकरी पुत्र नोकरीच्या मागे धावत आहेत तर दुसरीकडे हिंगोलीच्या या युवकाने योग्य नियोजन केल्यास शेतीमधुनही लाखोंचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.
पंकज यांनी फुल शेती करण्याचे ठरवले आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रशिक्षण देखील प्राप्त केले. प्रशिक्षणामध्ये फुलशेतीसाठी कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन करायचे याविषयी त्यांना चांगले ज्ञान मिळाले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पंकज यांनी जरबेरा लागवड करण्याचे ठरवले. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेती नक्कीच फायद्याची ठरू शकते. पंकज यांनीदेखील आधुनिकतेची कास धरत दहा गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस उभारले पॉलिहाऊसमध्ये त्यांनी जरबेरा लागवड केली.
यासाठी पंकज यांच्याकडे पुरेसे भांडवल नव्हते म्हणून त्यांनी बँकेकडून 14 लाखांचे कर्ज प्राप्त केले. जरबेराची लागवड करण्यासाठी एकूण उत्पादन खर्च दोन लाख रुपय आला. सध्या नांदेडमध्ये पंकज यांचे फुल विक्रीस जात आहेत आणि दिवसाला चार हजार रुपये उत्पन्न त्यांना मिळत आहे. खर्च वजा जाता पंकज यांना सुमारे पाच लाख रुपये नफा राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतीला आधुनिकतेची जोड देऊन कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळवले जाऊ शकते हे पंकज यांनी आपल्या उदाहरणावरून इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे. निश्चितच पंकज त्यांच्या या आधुनिक शेतीचा आदर्श ठेवत इतर नवयुवक शेतकरी पुत्र आधुनिकतेची कास धरत शेती क्षेत्राकडे वळतील.
महत्वाच्या बातम्या:-
बातमी कामाची! सरकारचा एक निर्णय आणि लाखो शेतकऱ्यांचा फायदा, जाणून घ्या 'या' योजनेबद्दल
भावा फक्त तूच रे……! कमी खर्चात कलिंगड आणि मिरचीचे उत्पादन घेऊन 'हा' शेतकरी बनला मालामाल
Published on: 01 April 2022, 04:28 IST