Success Stories

देशातील शेतकरी पुत्र सध्या शेती कडे पाठ फिरवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात तोटा सहन करावा लागत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत चालले आहेत. अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत असल्याने अनेक शेतकरी पुत्रांनी आता आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी नोकरीकडे तसेच अन्य उद्योगधंद्याकडे मोर्चा वळवला आहे.

Updated on 06 May, 2022 6:53 PM IST

देशातील शेतकरी पुत्र सध्या शेती कडे पाठ फिरवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात तोटा सहन करावा लागत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत चालले आहेत. अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत असल्याने अनेक शेतकरी पुत्रांनी आता आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी नोकरीकडे तसेच अन्य उद्योगधंद्याकडे मोर्चा वळवला आहे.

मात्र असे असले तरी देशात असेही नवयुवक आहेत जे नोकरी न करता शेती व्यवसायाला विशेष पसंती दाखवत आहेत. काही नवयुवक नोकरी असून देखील तिला त्यागपत्र देत शेती व्यवसायाकडे वळले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या एका नवयुवकाने देखील नोकरीकडे पाठ फिरवीत शेतीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

विशेष म्हणजे या नव युवकाने शेतीमध्ये बदल करीत चांगले यश संपादन केले आहे. उमरगा तालुक्यातील मौजे दावल मलिक वाडी येथील रहिवाशी शेतकरी गणेश विजयकुमार कवठे यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरत अवघ्या एक एकर क्षेत्रातून चांगली बक्कळ कमाई केली आहे.

गणेश यांनी आपल्या वडिलोपार्जित एक एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीने टोमॅटो पिकाची लागवड केली. सध्या त्यांनी लागवड केलेल्या टोमॅटो पिकाची हार्वेस्टिंग सुरु आहे टोमॅटो पिकाच्या पहिल्या तोड्यातुन त्यांना जवळपास 45 हजार रुपयांची कमाई झाली आहे. अजूनही गणेश यांच्या टोमॅटो पिकाची हार्वेस्टिंग सुरु आहे. सध्या टोमॅटोला मागणीदेखील अधिक असल्याने टोमॅटोची तोड अजूनही सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

दुःखद! वावरात उभ्या ऊस पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची ओढवली नामुष्की; शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

याला म्हणतात सक्सेस! रिटायर्ड ऑफिसरने सुरु केला शेळीपालन व्यवसाय; आज वार्षिक एक कोटींची उलाढाल

नामांकित कंपनीत नोकरी केली 

खरं पाहता गणेश पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी करत होते. मात्र नोकरीमध्ये मन रमत नसल्याने त्यांनी नोकरीला राम दिला आणि आपल्या गावी परतले. गावी परतून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली अन भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आपल्या वडिलोपार्जित एक एकर क्षेत्रात टोमॅटो पिकाची लागवड केली. अनेकदा असे बघायला मिळाले आहे की भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड शेतकऱ्यांना तोट्याची सिद्ध होते.

मात्र गणेश यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली आणि योग्य नियोजन करून यातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. शेती व्यवसायात योग्य नियोजन आणि कष्टांची सांगड घातली तर कमी जमिनीतही अधिक उत्पन्न मिळवता येऊ शकते हे गणेश यांनी दाखवून दिले आहे.

टोमॅटो शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली

गणेश यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड करण्याचे ठरवले आणि चार फूट × तीन फूट अंतरावर टोमॅटो रोपांची लागवड केली. एक एकर क्षेत्रासाठी त्यांना सुमारे 2100 रोपांची गरज भासली. टोमॅटो पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे हेतू त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला.

ठिबक सिंचन प्रणालीचा वापर विद्राव्य खते देण्यासाठी देखील गणेश यांनी केला यामुळे खतांची बचत झाली. विशेष म्हणजे गणेश यांनी रासायनिक ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला. टोमॅटो पिकासाठी त्यांनी मल्चिंग पेपर अंथरून लागवड केली असल्याने रोगराईचा धोका कमी झाला. शिवाय उत्पादनात भरीव वाढ झाली.

एवढेच नाही मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे पाण्याची देखील बचत झाली. सध्या टोमॅटोचा पहिला तोडा काढण्यात आला असून 75 कॅरेटचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. टोमॅटोला 30 रुपये किलो असा भाव मिळाला असल्याने त्यांना जवळपास 56 हजाराचे उत्पन्न मिळाले. निश्चितच गणेश यांचा प्रयोग यशस्वी झाला असून त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळाले आहे.

English Summary: Heavy! Kicked off the job and started farming; Making good money today
Published on: 06 May 2022, 06:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)