Success Stories

आज आम्ही तुम्हाला मुंबईतील एका मावशीची गोष्टी सांगणार आहोत, त्यांनी आपल्या व्यवसायामुळे आपलं नाव परदेशातही प्रचलित केलं आहे. वाचक मंडळींनो मला सांगा तुम्हाला खेकड्यांच वैशिष्ट्ये माहिती आहे का ? माहिती आहे ना, हो तेच आपण जर खेकड्यांना एका बादलीत ठेवलं तर तर बाहेर येणाऱ्या खेकड्यांना खाली ओढत असतात, त्यामुळे कोणताच खेकडा बाहेर येत नाही.

Updated on 25 March, 2021 10:03 PM IST

आज आम्ही तुम्हाला मुंबईतील एका मावशीची गोष्टी सांगणार आहोत, त्यांनी आपल्या व्यवसायामुळे आपलं नाव परदेशातही प्रचलित केलं आहे. वाचक मंडळींनो मला सांगा तुम्हाला खेकड्यांच वैशिष्ट्ये माहिती आहे का ? माहिती आहे ना, हो तेच आपण जर खेकड्यांना एका बादलीत ठेवलं तर तर बाहेर येणाऱ्या खेकड्यांना खाली ओढत असतात, त्यामुळे कोणताच खेकडा बाहेर येत नाही.

पण तुम्हाला माहिती आहे का , अशा वृत्तीच्या खेकड्यांनी मुंबईच्या मावशीची वेगळी ओळख मिळवून दिली असून त्यांना आता खेकड्याच्या मावशी असं नाव देखील मिळवून दिले  आहे. या खेकड्यांनी मावशीला अपयशात न ढकलता, यशाच्या शिखरावर पोहचवलं. आज आम्ही तुम्हाला गुणाबाईंची यशोगाथा सांगणार आहोत. आपल्या पारंपारिक व्यवसायाला जपत त्यांनी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्यांना आगरी महोत्सवात आगरी गौरव पुरस्कारही मिळाला आहे. या मावशीचे नाव आहे गुणाबाई नामदेव सुतार असे आहे.

हेही वाचा : योग्य विक्री व्यवस्थापनामुळे सीमाताई जाधव ठरल्या विविध पुरस्कारांचे मानकरी

गुणाबाई आधी नवी मुंबईच्या छोट्याशा खाडीच्या किनाऱ्यावर खेकडी पकडत. आता त्या या खेकडी परदेशात निर्यात करत आहेत. गुणाबाई यांचे वय  ६५ वर्षे आहे. गुणाबाई मासे पकडल्यानंतर मासळी बाजारात मासे विकायला येतात. रात्री १० वाजता मासे विकून त्या परत घरी जातात. १७ तास त्या आपल्या कामामुळे घराच्या बाहेर असतात. सकाळी घर सोडल्यानंतर सगळी कामे उरकूनच त्या घरी येतात. रात्री घरी आल्यानंतर घरची कामे करतात. गुणाबाई यांनी आपल्या आयुष्यात खुप कष्ट केले आहेत. गुणाबाई यांना व्यवसायातही खुप नुकसान झाले होते.

 

मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही आणि खेकडी मासे विकण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला. गुणाबाईंच्या घराजवळ कालवा होता त्या तेथे मासेमारी करून त्या घर चालवत असत. मात्र काही दिवसानंतर नागरीकरणाच्या लाटेत हा कालवा बुजविण्यात आला. त्यांची मासेमारी बंद झाली. पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि खाडी किणाऱ्यावर जाऊन खेकडे पकडण्यास सुरूवात केली.

हेही वाचा : घराच्या छतावर उभारला बटेर फार्म; कमी गुंतणुकीवर केली लाखो रुपायांची कमाई

मागणी वाढू लागल्यानंतर त्यांनी बाकीच्या महिलांकडून खेकडे विकत घेण्यास सुरूवात केली. सुरूवातीला काही हॉटेल्स व्यवसायिकांनी त्यांच्याकडून खेकडे विकत घेण्यास सुरूवात केली होती. ही मागणी पुर्ण करण्यासाठी त्यांनी इतर महिलांकडून खेकडे विकत घेण्यास सुरूवात केली.त्यानंतर चेन्नईमधील काही हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्याकडे खेकडे व माशांची मागणी केली. मग त्यांचा व्यवसाय खुप मोठा झाला. नवी मुंबईच्या खाडीवरून मिळणारी ही खेकडी गुणाबाई सुतार यांच्या कौशल्यामुळे थेट चेन्नईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचली.

विशेष म्हणजे त्यांचे कोणतेही शालेय शिक्षण झालेले नाही. आज त्यांच्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान त्यांना सिंगापूरहूनही  खेकड्यांची मागणी आल्याने त्या परदेशातही खेकडी पुरवू लागले. त्यांच्या कामात त्यांना त्यांच्या घरातील सदस्यांची मदत मिळाली . दरम्यान आता या व्यवसायाचे रुपांतर मोठ्या उद्योगात झाले आहे.

 

यशाच्या उंच शिखरावर पोहोचताना व्यवसाय करण्यासाठी गुणाबाई सुतार यांनी शासकीय परवानग्या घेण्यासाठी खुप सरकारी पायऱ्या झिजवल्या.पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. पहिली पर्यंत शिक्षण झाले असूनही निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कायदेशीर बाबी त्यांनी पुर्ण केल्या. दरवर्षी त्या पाच कोटींचे खेकडे निर्यात करतात.

English Summary: Gunabai exports five crore crabs abroad
Published on: 25 March 2021, 09:38 IST