Success Stories

शेतकरी विविध प्रकारच्या पिकांचे लागवड करतात. परंतु बऱ्याचदा बाजारपेठेचा अंदाज न आल्याने शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बाजारपेठेचा कल ओळखणे फार महत्वाचे असते.

Updated on 15 April, 2022 8:23 PM IST

शेतकरी विविध प्रकारच्या पिकांचे लागवड करतात. परंतु बऱ्याचदा बाजारपेठेचा अंदाज न आल्याने  शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बाजारपेठेचा कल ओळखणे फार महत्वाचे असते.

पिक लागवडी नंतरच्या दोन चार महिन्यात संबंधित पीक बाजारपेठेत किती प्रमाणात येऊ शकते. याचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो. हा अभ्यास जेवढा परिणाम कारक राहील तेवढा शेतमालाला बाजार भाव चांगला मिळेल याची हमी असते. याच पार्श्वभूमीवर  शेतमालाला बाजार पेठेत हमखास भाव मिळावा यासाठी कृषी विभागाकडून विकेल ते पिकेल हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या उद्देश आहे की, नेमकी बाजारपेठेत ज्या वेळी ज्या मालाला जास्त मागणी राहील असाच मालाचे उत्पादन घेणे हे होय. याच तत्वाचा वापर करून बरेच शेतकरी आता अशाच पद्धतीचेठिकाणी बाजार पद्धतीचा अभ्यास करून पीक लागवड करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातअसलेल्या लेंडाणे या गावातील शेतकऱ्याचे टरबूज बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास करून थेट काश्मीरच्या बाजारात पाठवण्यात आली आहेत.

नक्की वाचा:बिग ब्रेकिंग! गावठाण पासून 200 मीटरमधील जर जमीन असेल तर अशा जमिनीला 'एनए' ची गरज नाही, राज्य सरकारचा निर्णय

मालेगाव तालुक्यातील टरबूज काश्मीरच्या बाजारपेठेत

 एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील आपण मालेगाव, सटाणा व देवळा या एकमेकांना लागून असलेल्या तालुक्यांचा विचार केला तर बहुतांशी या परिसरात कांदे,  मका आणि फळबागांमध्ये डाळिंब या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आढळते. परंतु आता काही  वर्षापासून या परिसरातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बऱ्याच प्रमाणात बदल केलेला आहे. जर आपण कांदा या पिकाचा विचार केला तर भावा मध्ये असलेली अनियमितता ही शेतकर्‍यांना नेहमीच मारक ठरलेली आहे. एवढेच नाही तर डाळिंब या फळ पिकाचे लागवड क्षेत्र या पट्ट्यात खूपच अधिक होते. परंतु डाळिंब बागांवर मर आणि तेल्या या रोगांनी थैमान घातल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी डाळींब बागा उपटून काढले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आता नवनवीन पिके  घेत आहेत.याच पार्श्वभूमीवर या वर्षी मालेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ एक हजार पेक्षा जास्त हेक्‍टर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करण्यात आली होती.

यामध्येच मालेगाव तालुक्यातील लेंडाणे या छोट्याशा गावातील शेतकरी अनिल जगताप यांनी अवघ्या 30 गुंठे क्षेत्रावर कलिंगड चे चांगले उत्पादन घेतले. या शेतकऱ्याने पिकवलेल्या कलिंगडाची पहिली खेप विकेल ते पिकेल या अभियानाच्या माध्यमातून थेट काश्मीरच्या बाजारपेठेतपाठवण्यात आली आहे.

नक्की वाचा:जयभीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना 'या' राज्य सरकारची योजना देते प्रतिभावान मुलांना स्वप्न साकार करण्याची संधी

या अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बाजारपेठेत मागणी असलेल्या मालाची लागवड केली पाहिजे. यास पार्श्वभूमी विकेल ते पिकेल  ही संकल्पना प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांनीप्रत्यक्षात आणण्याची घोषणा केली आहे.

या अभियानाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ बावन्न शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल उत्तर व पूर्व भारतात विक्रीसाठी पाठवला जात आहे.

English Summary: good quality watermelon production taking by malegaon taluka farmer
Published on: 15 April 2022, 08:23 IST