Success Stories

सध्या शेतकरी हे आधुनिक शेती करत आहेत. यामधून त्यांना चांगले पैसे मिळतात. आपल्याला माहिती आहे, की शेती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक संकटे झेलत आपला माल बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्यांना झोप नसते. आता एका शेतकऱ्याने पेरुचे उत्पादन घेऊन चांगलाच नफा कमवला आहे.

Updated on 21 September, 2022 3:01 PM IST

सध्या शेतकरी हे आधुनिक शेती करत आहेत. यामधून त्यांना चांगले पैसे मिळतात. आपल्याला माहिती आहे, की शेती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक संकटे झेलत आपला माल बाजारात जाईपर्यंत शेतकऱ्यांना झोप नसते. आता एका शेतकऱ्याने पेरुचे उत्पादन घेऊन चांगलाच नफा कमवला आहे.

सोलापूर (Solapur) येथील करमाळा तालुक्याती शेटफळ (Shetphal) नोगोबाचे या गावातील शेतकऱ्याने पेरुच्या बागेतून लाखोंचा नफा मिळवला आहे. दत्तात्रय लबडे (Dattatray Labade) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा पेरु थेट केरळच्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. यामुळे त्यांची चर्चा सध्या सुरु आहे.

अनेक शेतकरी त्यांची शेती बघायला येत आहेत. दत्तात्रय लबडे यांनी अतिशय यशस्वीपणे पेरुची शेती केली आहे. दोन एकर पेरुच्या बागेतून त्यांनी गेल्या सहा महिन्यात 14 लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या जीवावर त्यांनी हे करून दाखवले आहे. त्यांनी VNR जातीच्या पेरुची लागवड केली आहे.

कामाची बातमी! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक, साखर आयुक्तांचा निर्णय..

त्यांचा पेरू सांगोल्याच्या व्यापाऱ्यांमार्फत केरळच्या बाजारात पाठवला जात आहे. सध्या केरळच्या बाजारात या पेरूला प्रति किलोसाठी 50 ते 85 रुपयांचा दर मिळत आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेत 50 रुपयांच्या आतच पेरुला दर मिळतो. त्यामुळं बाहेरच्या बाजारपेठेत पेरु पाठवणे परवड असल्याचे लबडे यावेळी म्हणाले.

'नको म्हटलं तरी पीएम किसान सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा'

शेतकऱ्यांनी बाजारपेठ ओळखून त्यांचा माल बाहेरच्या बाजारपेठेत पाठवला पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यांनी आत्तापर्यंत 24 टन पेरुची विक्री केली आहे. आणखी चार ते पाच टन पेरुचे उत्पादन निघण्याची शक्यता आहे. त्यांना यासाठी चार लाख रुपयांचा खर्च आला आहे. पेरुबरोबरच त्यांच्या शेतात केळी, मिरची, कलिंगड ऊस असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या;
१०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार, FRP बाबत महत्वपूर्ण माहिती
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी संपावर, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध..
'FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही'

English Summary: Fortune changed farming, shet fruit Kerala market, 14 lakhs
Published on: 21 September 2022, 03:01 IST