Success Stories

राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना उसाचे टनीज काढले तर यामध्ये शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. आता महळूंगे पडवळ (ता. आंबेगाव) या गावातील शेतकरी (Agricultural Information) राजेंद्र नरहरी आवटे यांनी थेट 50 गुंठ्यांत 120 टन ऊसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

Updated on 06 December, 2022 10:53 AM IST

राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना उसाचे टनीज काढले तर यामध्ये शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. आता महळूंगे पडवळ (ता. आंबेगाव) या गावातील शेतकरी (Agricultural Information) राजेंद्र नरहरी आवटे यांनी थेट 50 गुंठ्यांत 120 टन ऊसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे. त्यांनी जमिनीमध्ये एकात्मिक खत व्यवस्थापनाच्या (Integrated Fertilizer Management) जोरावर फक्त 50 गुंठे जमिनीत 86032 जातीच्या ऊसाचे तब्बल 120 मेट्रिक टन उत्पादन घेतले आहे. यामुळे त्यांना चांगला फायदा झाला. त्यांनी ऊस लागवडीनंतर 15 दिवसांची लायकोसिन, युरिया, उकिली ही औषधे प्रमाणित घेऊन आळवणी केली होती.

तसेच पुढे त्यांनी 20 दिवसांनी पुन्हा बडसुटर, युरिया यांची आळवणी केली होती. या आळवणीमुळे एका खुटातून 8 ते 12 फुटवे निघाले होते. यामुळे त्यांना उत्पादन वाढण्यास मदत झाली. तसेच शेतकऱ्याने जैविक खतांचा वापर देखील केला होता. याचा देखील त्याला फायदा झाला होता.

गुजरात कोणाच? विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत दिल्या जाणार्‍या अ‍ॅझोफॉसफो, अ‍ॅसिटोबॅकर यांसारख्या जैविक खतांचा वापर केला होत. त्याचबरोबर व्ही. एस. आय. उत्पादित मल्टिमायक्रो व मल्टिमॅक्रो फवारणीमुळे ऊसाच्या उत्पादनात भन्नाट वाढ झाली. ज्यामुळे शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शेतकरी त्यांची शेती बघण्यासाठी येत आहेत.

आता एसटीत द्या ऑनलाइन पैसे, सुट्या पैशांची कटकट मिटणार..

अनेक ठिकाणी जमिनी खराब होत चालल्या आहेत. यामुळे उत्पादन घटत आहे. यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी केला तर शेतीची पोत अजूनच वाढणार आहे. नदीच्या कडेला जमिनी अजूनच खराब होत चालल्या आहेत. यामुळे जमीन व्यवस्थित असेल तरच पिके जोरात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
50 हजारांचे प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली, 'या' दिवशी होणार जाहीर
नेतेच थकबाकीदार! औरंगाबादचे पालकमंत्री भुमरेंच्या पुत्राच्या नावावर 1 लाख 31 हजारांची थकबाकी
आता पाणीपट्टी थकवली की न्यायालयाची नोटीस, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे धाबे दणाणले..

English Summary: farming production 120 tons sugarcane 50 bundles Pathta,
Published on: 06 December 2022, 10:53 IST