समाजामध्ये असे बरेच व्यक्ती असतात की त्यांना नेहमीच जे काही रुळलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी हटके करण्याची कायमच मनामध्ये प्रचंड जिद्द असते. आपल्याला माहित आहेच की, बहुतेक जणांची एकच मानसिक स्थिती असते ती म्हणजे एखादा चांगला उत्पन्नाचा स्त्रोत असेल म्हणजे एखादी चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी असेल तर बाकीच्या कुठल्याच गोष्टी न करता आरामात जीवन व्यतीत करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो.
परंतु यामध्ये काही अवलिया हातातले काहीतरी चांगले सोडून एक सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्यांना फायदा होईल अशी काहीतरी गोष्ट करतात आणि व्यापक दृष्टिकोनातून सुरू केलेले असे कार्य नेहमीच लोकांच्या उपयोगी पडते हे देखील तेवढेच सत्य आहे. अशी एका शेतकरी पुत्राची हटके कहानी या लेखात आपण पाहणार आहोत.
नक्की वाचा:Nashik: नाशिकच्या शेतकऱ्याचा इस्राईल पॅटर्न! मत्स्यपालनातून होतेय लाखोंची कमाई..
शेतकरी पुत्राची कमाल
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या आर्णी तालुक्यातील पंकज महल्ले आणि श्वेता महल्ले या शेतकरी दाम्पत्याने त्यांच्या कामाच्या माध्यमातून 'फोर्ब्स' या यादीत स्थान पटकावले असून संपूर्ण आशिया खंडातील नामांकित
असलेल्या सामाजिक उद्योजकता क्रमवारीमध्ये त्यांच्या 'ग्रामहित' या कंपनीला जवळजवळ शंभर कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे. हे दांपत्य या कंपनीचे संस्थापक असून गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे.
'ग्रामहित' कंपनीचे काम
या दाम्पत्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल साठवूण विक्री करण्याची एक शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली असून त्यांच्याकडे साठवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता ते शेतकऱ्यांना करून देतात.
आपल्याला माहित आहेच कि शेतमाल विक्रीसाठी शेतकरी बाजारपेठेत जातो तेव्हा अनेक घटकांकडून त्यांचे शोषण केले जाते व हे शेतकर्यांचे होणारे शोषण थांबवून शेतकऱ्यांसाठी बाजार व्यवस्था सुलभ करण्यासाठी ग्रामहित काम करते.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांना ही सुविधा घेण्यासाठी कुठे जाण्याची गरज नसून अगदी घरी बसूनच मोबाईलच्या माध्यमातून ही सुविधा तुम्हाला एका क्लिकवर घेता येते. जेव्हा पेरणीचा काळ येतो तेव्हा शेतकऱ्यांना विविध ठिकाणाहून पैसा कर्जरूपाने घ्यावा लागतो.
कालांतराने उत्पादनात आल्यानंतर जो पैसा घेतलेला असतो तो परत करण्यासाठी शेतकऱ्यांना आहे त्या भावात शेतमाल विक्रीला आणावा लागतो. अशा वेळीस व्यापाऱ्यांकडून मालाचे भाव पाडले जातात व शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडतात. हा शेतकऱ्यांना होणारा त्रास होऊ नये यासाठी ग्रामहित प्रामुख्याने काम करते.
Published on: 04 September 2022, 09:41 IST