Success Stories

कांदा हे पीक म्हटले म्हणजे दराच्या बाबतीत कायमच अनियमितता या पिकाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. सर्वात जास्त भावामध्ये चढउतार पाहायला मिळत असेल तर ते फक्त कांद्यामध्ये.

Updated on 06 May, 2022 7:02 PM IST

 कांदा हे पीक म्हटले म्हणजे दराच्या बाबतीत कायमच अनियमितता या पिकाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. सर्वात जास्त भावामध्ये चढउतार पाहायला मिळत असेल तर ते फक्त कांद्यामध्ये. 

अगदी लॉटरी प्रमाणे असलेले हे पिक कधी कधी शेतकऱ्यांना खूप काही अपेक्षेपेक्षा जास्त देऊन जाते. नाहीतर बऱ्याचदा तर शेतकऱ्यांच्या हातून जे आहे तेसुद्धा हिरावून नेते. असे एकंदरीत कांदा पिकाची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु  योग्य नियोजन, स्थानिक आणि देशांतर्गत बाजारपेठ यांचा अभ्यास, जिद्द आणि मनात ठरवलेले पूर्णत्वास नेण्याची अफाट कार्यक्षमता असली तर काहीही शक्य नाही. याचंच प्रत्यंतर सध्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या बोराळे या गावच्या शेतकऱ्याच्या एकंदरीत कहाणीवरून येते. या शेतकऱ्यांची यशकथा आपण या लेखात पाहू.

 कांदा पाठवला थेट दुबईला(onion export in dubai)

 याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले बोराडे हे छोटेखानी गाव गिरणा नदीच्या काठी वसलेले असून या गावचा बराचसा भाग बागायती आहे. या गावातील शेतकरी बळीराम सिंह राजपूत यांनी अकरा एकर शेतात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती.

या वर्षी कांद्याला अगदी पोषक वातावरण असल्यामुळे व  अवकाळी पावसाचा फटका या पट्ट्यात थोडा देखील बसला नसल्याने एकरी 200 क्विंटल चांगल्या प्रकारचे उत्पन्न त्यांना मिळाले. तसे पाहायला गेले तर कांदा उत्पादक शेतकरी बहुतांशी कांद्याची साठवणूक हे चाळीतच करतात. चाळीत साठवणूक करताना जवळजवळ 45 ते 55 एमएम सर्वसाधारण आकाराचा कांदा लागतो. आणि जर तुम्हाला कांदा निर्यात करायचा असेल तर त्यासाठी 55 ते 60 एमएम कांद्याचा आकार असावा लागतो. त्यामुळे चाळीत कांदा साठवण्यासाठी प्रतवारी करत असताना 55 एम एम चा कांदा गोणी(onion bag)मध्ये व सर्वसाधारण आकाराचा कांदा चाळीमध्ये सर्वसाधारणपणे शेतकरी ठेवतात. विशेष म्हणजे भिला साहेब राजपूत यांचा पुतण्या बलराम सिंग राजपूत कांद्याची आयात निर्यात करीत असल्यामुळे दुबईच्या व्यापाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला व शेतातून कांदा थेट दुबई मार्केटला रवाना करण्यात ते यशस्वी झाले.

जर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे हा सगळा भागाचा विचार केला तर येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा इत्यादी नाशिक जिल्ह्यातील तालुके हे प्रमुख कांदा उत्पादक तालुके असल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना यांचा अनुभवाचा फायदा घेता येऊ शकतो व चांगल्या प्रतीचा कांदा थेट निर्यातीच्या माध्यमातून दुबई सारख्या ठिकाणी विकून नक्कीच फायदा मिळवता येऊ शकतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:दुःखद! वावरात उभ्या ऊस पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची ओढवली नामुष्की; शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

नक्की वाचा:प्रधानमंत्री वनधन योजनेतील ही आहेत आव्हाने आणि संधी, वाचा सविस्तर

नक्की वाचा:जलव्यवस्थापन भविष्याच्या दृष्टीने आहे महत्वाचे!जल है... तो कल है....!जल ही जिवन है...!

English Summary: farmer in borale nandgaon taluka nashik district export of onion in dubai
Published on: 06 May 2022, 07:02 IST