शेतकरी शेतीतून नवनवीन प्रयोग राबवून उत्पन्न घेत असतो. भात किंवा तांदूळ म्हंटल्यावर आपल्याला आठवतो तो पांढरा तांदूळ. मात्र बिहारमधल्या चंपारण मधील एक शेतकरी रंगत तांदळाची शेती करून घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न.
एवढेच नव्हे तर हा शेतकरी मॅजिक तांदळाची देखील शेती करतो, जे तांदूळ थंड पाण्यातही शिजतात. चंपारणच्या रामनगर पंचायतीत राहणारे विजयगिरी हे हिरव्या, काळ्या, लाल, रंगाच्या तांदळाच्या शेतीबरोबरच मॅजिक तांदळाची देखील शेती करतात.
मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सने (Minerals and vitamins) समृद्ध असलेल्या या तांदळाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ही माहिती कृषी संशोधन केंद्रानेही प्रकाशित केले आहे. विजय गिरी यांनी पारंपारिक शेती सोडून काही नवीन प्रयोग करायचे डोक्यात आणले आणि त्यानुसार हिरव्या, काळया आणि लाल तांदळाची शेती करायला सुरुवात केली.
लष्करी भागात तब्बल 50 हजार झाडे लावणार ; आयुक्त राजेश टोपे यांची मंजूरी
ते सेंद्रिय पद्धतीने शेती करतात त्यांचा दावा आहे की सेंद्रिय पद्धतीने (Organic methods) शेती केल्यानं पर्यावरणाचे संरक्षण होतं तसंच शेतीमध्ये देखील अधिक उत्पादन मिळते. रंगीत तांदळाच्या लागवडीने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे आणि चांगले उत्पादनही मिळत आहे असे त्यांनी सांगितले आहे.
मॅजिक तांदळाची शेती
विजय गिरी म्हणतात की, मॅजिक तांदूळ याची देखील ते शेती करतात. या तांदळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे तांदूळ थंड पाण्यात सुद्धा शिजते. या प्रजातीच्या तांदळाची शेती करून ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत. शिवाय त्यांच्या बरोबरच देशातील एकूण 30 ते 40 हजार शेतकरी त्यांच्या या मोहिमेमध्ये जोडले गेलेले आहेत. जे प्रत्येक वर्षी हिरव्या, लाल, काळ्या आणि मॅजिक तांदळाची शेती करतात. विजय गिरी यांना त्यांच्या या तांदूळ उत्पादनाच्या कार्याबद्दल जिल्हा आणि राज्यस्तरावर देखील पुरस्कार देण्यात आले आहेत.
मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60% अनुदान ; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या लाभ
Published on: 20 July 2022, 03:23 IST