शेतकरी कधी फायद्यात जाईल, आणि कधी तोट्यात जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. कृषी प्रधान देशात शेती म्हणजे सध्या जुगाराचा खेळ बनला आहे. यामुळे शेतकरी अनेकदा तोट्यात जातो. येथील मोठी लोकसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा हाकला जातो. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक संकटांचा सामना करत काही शेतकरी सध्या लाखो रुपये देखील कमवत आहेत.
बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेती व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न काही शेतकरी घेत आहेत. आता जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या एका शेतकऱ्याने देखील टोमॅटो शेतीमध्ये (Tomato Farming) लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे. यामुळे या शेतकऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे.
येथील जाफराबाद तालुक्यातील बोरखेडी चिंच येथील शेतकरी रमेश कडुबा कदाळे यांनी एक एकर टोमॅटो शेतीतुन (Tomato Cultivation) तब्बल 10 लाखांची कमाई केली आहे. यामुळे त्यांना चांगले दिवस आले आहेत. दरवर्षी ते शेतात उसाची लागवड करतात. तसेच काही भाजीपाला देखील लावतात. भाजीपाल्यासाठी ते काही शेत राखूनच ठेवत असतात. यावर्षी रमेश यांनी एक एकर टोमॅटोची लागवड केली होती. यातून त्यांना तब्बल 10 लाखांची कमाई झाली आहे.
मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित, अनेकांना धक्का
यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटी त्यांनी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. फेब्रुवारीत लावलेल्या टोमॅटोचे मे महिन्यात उत्पादन मिळू लागले. मे अखेरपर्यंत त्यांना या शेतीतून तब्बल 10 लाखांचे उत्पन्न मिळाल्याची त्यांनी माहिती दिली. तब्बल दोन वर्षांनंतर सध्या टोमॅटोला अधिकचा दर मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र, साखर कारखान्यांबाबत म्हणाले..
सध्या त्यांच्या टोमॅटोंना प्रती कॅरेट 1 हजार ते एक हजार 300 चा भाव मिळाला. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे आणि पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. अनेकांनी टोमॅटो रोडवर फेकून दिले होते. यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली नाही. यामुळे सध्या टोमॅटोचे दर वाढले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
घोडगंगाच्या मतदार यादीत मृत सभासदांची नावे, कारखान्याने सर्वे केलाच नाही
आता रेशनच्या दुकानातही मिळणार भाज्या आणि फळे, विक्रीला परवानगी
शेतकऱ्यांनो उसाची नोंदणी झाली नसेल तर काळजी करू नका, साखर आयुक्तालयाने घेतला मोठा निर्णय
Published on: 10 June 2022, 12:15 IST