Success Stories

सौदीमधील चांगल्या पगाराच्या नोकरीला लाथ मारून या तरुणाने शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गावातील लोकांनी त्याला येडयात काढले. मात्र तो खचला नाही. असे असताना आता मात्र त्यांना मिळालेले यश पाहून अनेकांनी त्यांचा आदर्श घेतला आहे.

Updated on 27 March, 2022 4:13 PM IST

आताच्या काळात आपण बघतो की अनेक तरुण हे घरी चांगली शेती असताना देखील शेती न करता नोकरीच्या मागे लागतात. असे असताना मात्र याला काहीजण अपवाद आहे. काहीजण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करतात. आता सौदीमधील चांगल्या पगाराच्या नोकरीला लाथ मारून या तरुणाने शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गावातील लोकांनी त्याला येडयात काढले. मात्र तो खचला नाही.

असे असताना आता मात्र त्यांना मिळालेले यश पाहून अनेकांनी त्यांचा आदर्श घेतला आहे. अश्रफ अली असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यात हतुआ तहसीलच्या लाईन बाजार या ठिकाणी ते वास्तव्यास आहे. तब्बल 30 वर्षे सौदी अरेबियामध्ये त्यांना एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली. त्यांना जास्त पगार देखील होता.

त्यांना मात्र काळी माती, गाव त्यांना खुनवत होतं. अखेर 2017 मध्ये त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाने त्यांना अनमोल सहकार्य दिले. पपईचे पाचशे रोपे देखील दिली. अश्रफ यांनी ही 500 झाडे लावली. या 500 झाडातून त्यांना सुमारे साडेचारशे क्विंटल पपईचे उत्पादन झाले. यामधून त्यांना चांगले पैसे देखील मिळाले. आता अली यांच्या या शेती क्षेत्रातल्या यशामुळे पंचक्रोशीत त्यांच्याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. थोड्याच दिवसात यांनी शेतीमध्ये चांगला जम बसवला आहे. अनेक तरुणांनी त्यांचा आदर्श घेतला आहे. सुरुवातीला त्यांच्यावर हसलेले लोकच आता त्यांचे गोडवे गातात. ते पपईच्या शेतीतून वार्षिक दहा लाख रुपये उत्पन्न कमवीत आहेत. ते म्हणाले की, 'मी गावाकडे या शेतीतून 10 लाख कमवत आहे आणि विशेष म्हणजे माझ्या कुटुंबासोबत राहत आहे.

गावाकडे शेती करून मी दोन मुल आणि एका मुलीचा विवाह थाटात संपन्न केला. मुलांसाठीही दुकाने उघडण्यात दिली, जेणेकरून प्रत्येकाला रोजगार मिळेल'. तसेच तरुणांनी शेतीत कष्ट केले, योग्य अभ्यास केला तर त्यांना यश हे मिळतेच, यामुळे केवळ नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेती करावी आणि यामध्ये नवनवीन प्रयोग केले तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.

महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय, कर्जमाफीबाबाबत आता शेतकऱ्यांचे टेन्शनच मिटले..
...म्हणून मला त्या फाइलवर सही करावी लागली!! आणि शेतीत बदल घडवायचा असे मी मनाशी पक्के ठरवले
बिबट्या सफारी बारामतीला हलवणार? अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

English Summary: doing farming by kicking his job abroad, today he has a turnover of lakhs
Published on: 27 March 2022, 04:13 IST