Success Stories

यशस्वी होण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वयाच बंधन नसतं. माणूस कोणत्याही वयात स्वतःला सिद्ध करू शकतो मात्र त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागते. सचिन तेंडुलकर वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करतो आणि क्रिकेटचा भगवान बनतो.

Updated on 05 May, 2022 7:05 PM IST

यशस्वी होण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वयाच बंधन नसतं. माणूस कोणत्याही वयात स्वतःला सिद्ध करू शकतो मात्र त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागते. सचिन तेंडुलकर वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करतो आणि क्रिकेटचा भगवान बनतो.

डोनाल्ड ट्रम्प उतरवयात राजकारणात येतात आणि आर्थिक महासत्ता असलेल्या देशाचे राष्ट्रध्यक्ष बनतात. तर वयाच्या 84 व्या वर्षी मनकर्णा आजीबाई शेतीत आपली एक नवीन छाप सोडत यशाचे शिखर गाठतात. या तिन्ही उदाहरणात क्षेत्र भलेही वेगळे असू द्यात मात्र त्यासाठी आवश्यक कष्ट सारखेच आहेत. यामुळे माणूस आपल्या कष्टाने अशक्य देखील शक्य करू शकतो यात काही तिळमात्रही शँका नाही.

आजकाल नवयुवकांना शेती करतांना अक्षरशः नाकी नऊ येतात मात्र मनकर्णा आजीबाई याउलट शेतीमध्ये नवीन प्रयोग करत लाखोंचे उत्पन्न कमवतात. तुम्हाला 84व्या वर्षी मनकर्णा आजीबाई शेती करतात हे ऐकूनच कदाचित शॉक बसला असेल पण मात्र या तरुण आजीबाई शेतीमध्ये अजूनही तरुण माणसाप्रमाणे काम करतात. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे गोरेगाव येथील मनकर्णा आजीबाई 84 वर्षाच्या आहेत.

या उतार वयात अनेकांना आपले दैनंदिन काम करणं देखील जमत नाही मात्र या आजीबाई या वयात शेती करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत आहेत. विशेष म्हणजे आजिबाईंनी शेतात केलेल्या या अभूतपूर्व कामाबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांचा गुणगौरव देखील केला आहे. आजीबाई आपल्या शेतातील सर्व कामाचे नियोजन स्वबळावर करतात आणि त्यातून लाखो रुपयांची कमाई करतात. आजीबाई आपल्या गावालगत असलेल्या शेतजमिनीत आपल्या नातवंडासोबत राहतात.

महत्वाच्या बातम्या:

Sugarcane : अतिरिक्त ऊस संकट नसून सुवर्णसंधी!! या नवयुवकाचा हा प्रयोग अतिरिक्त ऊसासाठी ठरला वरदान; वाचा

मानलं लेका! परदेशात शिक्षण घेतलं अन मायदेशी परतल्यावर शेती सुरु केली; आज लाखोंचे उत्पन्न

मनकर्णा आजीबाई यांच्या पतीचे 1972 मध्ये एका आजाराने निधन झाले. तेव्हापासून संसाराचा सर्व गाडा त्यांच्या खांद्यावर आला. त्यावेळी मनकर्णा आजीबाई यांच्या वाट्याला 5 एकर शेतजमीन आली. 5 एकर शेतजमीन कसून त्यांनी आपल्या मुलांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सांभाळ केला. 5 एकरापासून शेती करायला सुरवात केली अन आता या आजीबाईकडे तब्बल 30 एकर शेतजमीन आहे.

सुरवातीच्या काळात त्यांनी शेतीत फळबाग लागवड केली होती. मात्र आता त्या हंगामी पिकांची यशस्वी शेती करीत आहेत. आजीबाई शेती फक्त नावाला करत नाहीत तर शेतीमध्ये नेहमी नवनवीन प्रयोग देखील करत असतात. या प्रयोगाच्या जोरावरच आजीबाईंच्या ज्या जमिनीत केळी लागवड करणे देखील अशक्य मानले जाते त्या जमिनीत आजीबाईनी केळीचे भरघोस असे उत्पादन मिळवण्याची किमया साधली आहे.

यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांचा 2002 मध्ये 9 हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देऊन सत्कार देखील केला होता. विशेष म्हणजे या वयात शेती करत असताना देखील त्यांची नजर आणि ऐकण्याची क्षमता अबाधित आहे. आजही आजी आपल्या शेतात मजुरांसोबत काम करतात. आजी बाई शेती करून आजही स्वाभिमानाने आपले आयुष्य जगत आहेत. निश्चितपणे आजीबाईंची ही यशोगाथा आजच्या तरुणाईला लाजवणारी आहे.

English Summary: At the age of 84, Mankarna Ajibai earns millions from farming; The abandoned story of the 'young' grandmother who embarrassed the youth
Published on: 05 May 2022, 07:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)