देशातील शेतकरी पुत्र आता शेती करण्याऐवजी नोकरीकडे वळू लागले आहेत मात्र असे असतानाच उच्च शिक्षण घेऊन देखील शेती करण्याची आवड असलेले व्यक्ती देखील काही कमी नाहीत. राजस्थान मधील जयपूर येथील इंद्रराज जाठ आणि सीमा सैनी हेदेखील उच्चशिक्षित असून शेती करू लागले आहेत. विशेष म्हणजे शिक्षण घेत असतानाच या दोघांनी भविष्यात नोकरी न करता शेतीच करायची हा निर्धार केला होता.
2017 मध्ये दोघांचे एग्रीकल्चर चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला. मात्र या दोघांना नोकरी करायची नव्हती. सीमाने एमएससी अग्रिकल्चर आणि इंद्रराजने बीएससी एग्रीकल्चरचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर या दोघांनी मिळून राजस्थानमधील खोरा श्यामदास गावात सुमारे दीड हेक्टर जमीन भाड्याने घेतली आणि तिथे ते एकात्मिक कृषी प्रणाली आणि कृषी पर्यटनातून चांगला नफा कमवत आहेत आणि लोकांना शेतीशी संबंधित इतर व्यवसायांबद्दल देखील अवगत करीत आहेत.
हेही वाचा:-Poultry: निवृत्तीनंतर 'हा' क्रिकेटर करतोय कुक्कुटपालन; तुम्हीही सुरु करा आणि कमवा
या ठिकाणी इंद्रराज आणि सीमा दोघे शाश्वत शेती तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन, गाई पालन आणि उंट पालन हे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे शेती करण्यासाठी त्यांना बाहेरून काहीही घेण्याची गरज नाही. कारण की जनावरांच्या चाऱ्यापासून ते शेतीसाठी आवश्यक शेणखतापर्यंत सर्व काही ते स्वत: या ठिकाणी तयार करतात आणि शेतात तयार केलेली उत्पादने येथे येणारे पाहुणे खरेदी करतात.
हेही वाचा:-Onion: डाळिंबरत्न बी.टी गोरेंचा राडा!! एकरात 25 टन कांद्याचे उत्पादन
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सीमा आणि इंद्रराज दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. यामुळे या दोघांना शेतीचे आवश्यक ज्ञान अगदी बाल वयातच मिळाले होते. या ज्ञानाचा उपयोग करत गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या उत्तम मॉडेलने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सीमा म्हणतात की, “आपण फक्त शेतीवर अवलंबून राहिलो तर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. जोपर्यंत शेतकरी इतर शेती व्यवसायात सामील होत नाहीत तोपर्यंत पुढे जाणे कठीण आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
ऍग्री टुरिझम करण्याचा विचार कसा आला
सीमा आणि इंद्रराज यांनी जेव्हा शेती सुरू केली तेव्हा ते शेतातच मातीचे घर बांधून राहू लागले. लोकांना ते छोटंसं राजस्थानी घर इतकं आवडलं की अनेकांनी त्याच्या शेतात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी चिखल, शेण आणि भुसा यापासून दोन झोपड्या बांधल्या होत्या, ज्या पारंपारिक राजस्थानातील जुन्या घरांसारख्या होत्या, ज्या गावात तो राहत होता ते गाव दिल्ली हायवे आणि जयपूर शहराच्या जवळ आहे. त्यामुळेच इथे कृषी पर्यटनाचा विकास केला तर नक्कीच यश मिळेल, अशी त्यांना खात्री होती.
या विचाराने त्यांनी ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन सुरू केले. येथे त्यांनी मातीचे पाच कॉटेज आणि एक शयनगृह देखील बांधले, जे बांधण्यासाठी त्यांना सुमारे दोन वर्षे लागली. स्थानिक कारागिरांसोबत मिळून त्यांनी ही मातीची घरे बनवली. हे संपूर्ण मॉडेल तयार करण्यासाठी त्यांना सुमारे आठ ते दहा लाखांचा खर्च आला. गेल्या वर्षी त्यांनी या व्यवसायातून सुमारे 35 लाखांची उलाढाल केली. एकंदरीत शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून काळाच्या ओघात बदल केल्यास निश्चितच त्यातून फायदा होतो. या दोन्ही मित्रानी देखील हे दाखवून दिले आहे.
Published on: 23 April 2022, 05:56 IST