भारत हा कृषिप्रधान देश आहे देशातील सर्वाधिक जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे शिवाय येथील 90 टक्के लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. सध्या शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडून आले आहेत. तसेच शेतीला तंत्रज्ञानाची जोड, यंत्र सामग्री ची सोबत यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न मिळत आहे.
शेतीला तंत्रज्ञानाची जोड:-
सध्या शेतीमध्ये तरुण वेगवगळे प्रयोग करत आहे तंत्रज्ञानाची मदत आणि यंत्र सामग्री ची सोबत यामुळे शेती करणे सुखकर झाले आहे. शिवाय कमी वेळात अधिक कामे होत असल्यामुळे मजुरांची सुद्धा जास्त गरज भासत नाही. त्यामुळे अधिक वेळ वाचत आहे. शिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने पीक पद्धती मध्ये सुद्धा बदल घडून आला आहे त्यामुळे शेतकरी बांधवाचे उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जम्मू काश्मीर शोपिया येथील सफा नगरी या लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका तरुणाने कमाल केली आहे चक्क आपले पदवी चे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न धावता शेती करण्याचे ठरवले. पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने सरकारी किंवा खाजगी नोकरी सुद्धा केली नाही. नोकरी नाही करायचे असे ठरवून त्याने शेतीकडे आपले लक्ष केंद्रित केले. आणि नोकरी पेक्षा शेतीमधून जास्त पैसे कमवू शकतो हे त्याने गावाला सिद्ध करून दाखवले आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे मोहम्मद आयुब.
हेही वाचा:-TVS ने केली नवीन क्लासिक स्कुटर लाँच, हे आहेत खास फीचर्स तर एवढी असेल किंमत
ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती:-
सुरुवाती पासूनच मोहम्मद आयुबला काहीतरी वेगळे करायचे होते. म्हणून त्याने पदवी नंतर त्याने शेती करण्याचे ठरवले. म्हणून त्याने ऑर्गेनिक आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने शेती करण्याचा विचार केला आणि काही दिवसात सुरुवात सुद्धा केली. त्याने त्याकडे असलेल्या 2 एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला लागवड केली आणि त्याच्या माध्यमातून तो सध्या लाखो रुपये कमवत आहे तसेच ज्या भाज्यांना प्रचंड मागणी असते त्याच भाज्या तो आपल्या रानात पिकवतो.
हेही वाचा:-पीकविमा कंपन्यांनी आदेश नाकारले असल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा कंपणीविरुद्ध आंदोलन जाहीर
काश्मीर मध्ये सफरचंदाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते शिवाय तेथील वातावरण पोषक असल्यामुळे येथील 90 टक्के लोक सफरचंदाचे उत्पन्न घेत असतात परंतु उत्पन्न जास्त असल्यामुळे सफरचंदाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते. त्यामुळं काश्मीर मध्ये सफरचंदाला 25 ते 30 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे परंतु आयुब ने त्या वेळी आपल्या शेतामध्ये मुळ्याची शेती करण्याचे ठरवले आणि आता तो त्यामधून प्रति किलो 40 ते 50 रुपये कमवत आहे.
Published on: 07 October 2022, 01:16 IST