अनेकदा कोणतीही सार्वजनिक कामे करत असताना सरकारकडून लवकर मदत मिळत नाही. यामुळे अनेक तोटे सहन करावे लागतात. मात्र आता कोणत्याही शासकीय अनुदानाची किंवा मदतीची वाट न पाहता एखादे मोठे काम लोकवर्गणीतून सहज होऊ शकते हे दाखवून दिले आहे. यामुळे या गावाची चर्चा सध्या सुरू आहे. मल्लेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी गव्यांपासून दरवर्षी होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ७० एकर शेतीला लोकवर्गणीतून कुंपण घातले आहे.
यामुळे आता त्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिमेला डोंगर कपारीत वसलेले शेवटचे गाव म्हणजे अवघ्या २०० ते २५० लोकवस्तीची मल्लेवाडी. वनक्षेत्राला लागून असल्याने येथे नेहमी गव्यांचा वावर असतो. यामुळे शेतातील भाजीपाला आणि जनावरांच्या चाऱ्यांचे नेहेमी नुकसान होत असे. तसेच येथील शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून रात्रभर शेतावर पहारा द्यावा लागत होता.
यामध्ये थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी गवे पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. यावर कायतरी उपाय केला जावा, असा विचार शेतकरी करत होते. यामध्ये पिकांची सुरक्षा बुजगावणे, डांबरगोळी, फटाके फोडणे, ओरडण्याचा आवाज केला गेला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
आता सातबारा उतारा करता येणार स्कॅन, शेतकऱ्यांचा फायदाच फायदा..
येथील शेतकऱ्यांनी वन्यप्राणी पिकांचे अतोनात नुकसान करीत असल्याच्या तक्रारी अनेकदा शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केल्या. मात्र, संबंधित विभागाने याची गंभीरतेने दखल घेतली नाही. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे शेवटी ग्रामस्थांनी एकत्र येत स्ववर्गणी काढून पाच लाख रुपये जमा केले आणि त्यातून ७० एकर शेतजमिनीच्या भोवती तारेचे कुंपण घातले आहे.
जमीन फक्त २ बिघा, उत्पन्न ५ लाख, राजेंद्रराव करतात तरी काय, जाणून घ्या..
हे गाव दुर्गम डोंगर भागात असल्याने कोणीही लोकप्रतिनिधी इकडे फिरकत नाहीत. वन अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होते. त्यामुळे ग्रामस्थ एकत्र येत शासकीय मदतीची वाट न पाहता लोकवर्गणीतून शेतीला कुंपण घातले आहे, यामुळे आता शेतकऱ्यांचे कायमचे टेन्शन मिटले आहे. आता शेतात कोणतीही पिके घेता येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेवटची संधी!! एवढ्या स्वस्तात मिळत आहे बार-सिमेंट-विटा, घर बांधताना पैशांची होणार बचत..
२०२३ पर्यंत बटाटे आयात करण्यास परवानगी, दर कोसळण्याची शक्यता
Citroen C3 कारचे बुकिंग भारतात सुरू, अनेक दिवसांची प्रतीक्षा होणार पूर्ण..
Published on: 06 July 2022, 02:24 IST