Success Stories

आता उत्तराखंड राज्यातील (Uttrakhand) देहरादून येथील एका शेतकऱ्यांनी कमी जमिनीत लाखो रुपये उत्पन्न कमवून शेती नको म्हणणाऱ्या नवयुवकांसाठी एक आदर्श उभा केला आहे. डेहराडून जिल्ह्यातील मौजे राणीपोखरी येथील शेतकरी राजेंद्र सजवान यांनी कमी जमिनीत लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

Updated on 05 July, 2022 6:03 PM IST

शेती करणे सध्या खूपच जिकरीचे काम झाले आहे. अनेकजण शेती परवडत नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर शेती असताना देखील ती करत नाहीत. शेतीमध्ये (Farming) अनेक वर्षांपासून सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) आता शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना आता कोणी पोरी देखील देत नाहीत, यावरून शेतीची भीषणता लक्षात येते.

असे असताना देशात असेही अनेक शेतकरी आहेत जे शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करत लाखो रुपये उत्पन्न काढत आहेत. आता उत्तराखंड राज्यातील (Uttrakhand) देहरादून येथील एका शेतकऱ्यांनी कमी जमिनीत लाखो रुपये उत्पन्न कमवून शेती नको म्हणणाऱ्या नवयुवकांसाठी एक आदर्श उभा केला आहे. डेहराडून जिल्ह्यातील मौजे राणीपोखरी येथील शेतकरी राजेंद्र सजवान यांनी कमी जमिनीत लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

यामुळे त्यांची चांगलीच चर्चा सुरु आहे. शेती कमी जरी असली तरी देखील काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत लाखों रुपये उत्पन्न कमावले जाऊ शकते. राजेंद्र राव एक अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे फक्त दोन बिघा शेत जमीन आहे. दोन बिघा शेत जमिनीत राजेंद्रराव तब्बल पाच लाखांची वार्षिक कमाई करत आहेत. राजेंद्र सजवान अवघ्या दोन बिघा शेतजमिनीत गाई पालन, मत्स्यपालन, बदक आणि कुक्कुटपालन करतात.

जाता जाता महाविकास आघाडी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकरी खुश..

त्यांना पत्नी विमला देवी आणि त्यांचे इतर परिवारातील सदस्य देखील साथ देतात. ते शेतात बॉयलर, क्रायलर आणि कडकनाथ कोंबडीचे पालन करत आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी स्वत: कोंबडी फार्म सुरू केला. त्याचे तीन भाग करून एकात बॉयलर, दुसर्‍या भागात क्रायलर आणि तिसर्‍या भागात कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांचे पालनपोषण सुरू केले. तसेच तलाव तयार करून त्यात मत्स्यपालन सुरू केले. ज्यामध्ये राजेंद्रराव रोहू, ग्रास, कामण या प्रजातींचे माशांचे पालन करत आहेत.

विरोधी पक्षनेतेपदावर दादाच? शरद पवार घेणार मोठा निर्णय...

त्यांनी या तलावाचा दुहेरी फायदा घेत त्यांनी बदकपालनही सुरू केले. बदकांच्या संगोपनासह तलावामध्ये त्यांच्या फिरण्यामुळे, जेथे ऑक्सिजनचे प्रमाण देखील राखले जाते आणि शेवाळ देखील तयार होत नाही. तसेच त्यांनी जर्सी, ह्युस्टन आणि फ्रिजियन जातीच्या गायीही पाळल्या आहेत. त्यांना दूध विक्रीतूनही भरपूर नफा होतो. त्यांच्याकडे गोबर गॅस प्लांट, मिनी ट्यूबवेलपासून सेंद्रिय खतही राजेंद्र यांच्या शेतात तयार केले जाते. यामधून त्यांना ५ लाख रुपये मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
मोठ्या मनाचा शेतकरी!! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे..
सोलरमुळे आयुष्यच बदलले, 12 एकर शेती झाली हिरवीगार..
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..

English Summary: 2 bighas land, income 5 lakhs, Rajendrarao
Published on: 05 July 2022, 06:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)