बरेच विद्यार्थी अगदी लहान वयामध्ये देखील असामान्य बुद्धिमत्तेचे असतात. अगदी लहान वयापासून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची सवय असते.
अगदी तुम्ही काही करत राहिलात तरी तुम्हाला विचारतील की तुम्ही हे का करत आहात व त्याच्या ने काय होते? असे प्रश्न ते करीत असतात. या प्रकारचे प्रश्न जेव्हा ते आपल्याला विचारतात तेव्हा ते आपल्याला एकदम सहजतेने आणि सामान्य वाटते.
परंतु हाच त्यांचा जिज्ञासू वृत्तीचा गुण कालांतराने पुढे चालून त्यांच्या हातून एखादी नवनिर्मिती किंवा वेगळे संशोधन करण्यासाठी कामात येतो व अशा विद्यार्थ्यांच्या हातून सर्वांना फायदेशीर अशा बाबींचा शोध लागतो. या लेखामध्ये आपण अशाच एका बारावीच्या विद्यार्थिनीने बनवलेल्या एका विशिष्ट मिश्रणाविषयी माहिती घेणार आहोत.
या मिश्रणाचा वापर अनेक पिकांच्या खोडाचे खतात रूपांतर होण्यासाठी अवघे 28 दिवस लागतात. एवढेच नाही तर जमिनीची सुपीकता देखील 23 टक्क्यांनी वाढण्यास मदत होते.
नक्की वाचा:डर के आगे जीत है! कांद्याने रडवले तर पातीने हसवले; वाचा भन्नाट शेतकरी दाम्पत्याची यशोगाथा
बारावीच्या विद्यार्थ्यांनी ची कमाल
आपण शेतामध्ये गहू आणि भात लागवड केलेली असते. या पिकांची काढणी झाल्यानंतर या पिकांचा बराचसा खोडाचा भाग शिल्लक राहतो. हा खोडाचा भाग नष्ट करण्यासाठी अगदी विदेशात देखील मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. कारण यामुळेप्रदूषण यासारख्या समस्या देखील निर्माण होतात कारण बरेच शेतकरी असले पिकांचे अवशेष जाळतात.
परंतु यावर आता फिरोजपुर जिरा येथील शहीद गुरु रामदास सरकारी मुलींच्या उच्च माध्यमिक स्मार्ट स्कूल ची विद्यार्थिनी भजन प्रीत कौर या मुलीने एक अनोखा शोध लावला असून या शोधासाठी तिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुरस्कार येथील मिळाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पंजाबच्या आठ विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन आपले प्रयोग सादर केले होते. त्यात भजन प्रितच्या या प्रकल्पाची निवड 23 व 25 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
या तिच्या शोधाबद्दल भजन प्रीत ने सांगितले की, आम्ही गूळ, शेण, कुजलेली झाडे आणि यीस्टचे मिश्रण तयार केले. नंतर त्याची शेतातील खोडांवर फवारणी केली. यामुळे 28 दिवसात खोड कुजून जमिनीशी एकरूप होईल. हे खोड नष्ट होण्या बरोबरच जमिनीची सुपीकता सुमारे 23 टक्के वाढेल. कारण पुढच्या भागावरही त्यांचा परिणाम चांगल्या पद्धतीने दिसून येईल.
यासोबतच या मिश्रणासाठी एकरी केवळ पाचशे रुपये खर्च येत असून हे एक लिक्विड स्वरूपात आहे.पहिल्या टप्प्यातील संशोधनाद्वारे जे मिश्रण तयार करण्यात आले होते त्याद्वारे खोड नष्ट करण्यासाठी 42 दिवस लागत होते. परंतु पुन्हा त्यावर संशोधन करून आता हा कालावधी 28 दिवसांवर आणला आहे.
नक्की वाचा:अधिक उत्पन्नासाठी लागवड करा सुधारित विकसित धानाचे वाण, अधिक होईल नफा
नक्की वाचा:शेती परवडणारी आणि समृध्द करायची असल्यास मातीकडे आणि सेंद्रिय शेती कडे लक्ष द्यावे लागेल
Published on: 13 June 2022, 06:35 IST