Success Stories

यंदाही एप्रिलच्या मध्यात ५० रुपये क्रेटचा दर असताना १२५ शेतकऱ्यांनी धाडस करून ६०० एकरांत टोमॅटोची लागवड केली. एकरी एक ते दीड लाखाचा खर्च केला. सुरुवातीला १०० रुपये दर मिळाला. एका क्रेटची क्षमता २० किलो टोमॅटोची असून प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपये दर मिळाला. आता २००० रुपये क्रेटने ‘टोमॅटो’ची विक्री होत आहे.

Updated on 27 July, 2023 8:55 AM IST

यंदाही एप्रिलच्या मध्यात ५० रुपये क्रेटचा दर असताना १२५ शेतकऱ्यांनी धाडस करून ६०० एकरांत टोमॅटोची लागवड केली. एकरी एक ते दीड लाखाचा खर्च केला. सुरुवातीला १०० रुपये दर मिळाला. एका क्रेटची क्षमता २० किलो टोमॅटोची असून प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपये दर मिळाला. आता २००० रुपये क्रेटने ‘टोमॅटो’ची विक्री होत आहे.

परिणामी येथील १२ शेतकरी ‘कोट्यधीश’ तर ५५ जणांनी ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. उर्वरित छोटे शेतकरीही ‘लखपती’ झाले आहेत. गावात लागलेले आणि सोशल मीडियात व्हायरल झालेले ‘होय आम्ही, करोडपती- लखपती धुळवडकर’ बॅनरही त्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे.

नेहमीच ‘लाल चिखल’ ची अनुभूती घेणाऱ्या धुळवडकरांना ८-१० वर्षातून एकदा ‘सट्टा’ लागावा याप्रमाणे यंदा वधारलेल्या भावाने टोमॅटोच्या ‘लाली’ चा सुखद धक्का दिला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हलका होण्यास हातभार लागला.

डोंगर कपारीत वसलेल्या येथील शेतकऱ्यांनी पोकलेन, जेसीबी मशीनच्या साहाय्याने टेकड्या सपाटीकरण करून त्यावर मुरूम, माती टाकून लाखो रुपयांचा खर्च करत जमिनी तयार केल्या आहेत. मुरमाड, माळरानाची आणि पाण्याचा सहज निचरा होणारी ही जमीन कोथिंबीर, कोबी, मेथी या पालेभाज्यांबरोबरच टोमॅटो आणि कांदा पिकासाठी अत्यंत लाभदायी ठरली आहे.

शेतात सुपीक करण्याचा उत्तम मार्ग, मजुरीचा खर्च न करता काम होईल...

साहजिकच या मुरमाड जमिनीत टोमॅटो हेच धुळवडकरांचे गेल्या १० वर्षापासून मुख्य पीक बनले आहे. मात्र एकरी लाखभर रुपये खर्च करूनही कधी २००-५०० तर कधी ५०-१०० अशा कवडीमोल दराने टोमॅटो विकावा लागल्याचा इतिहास आहे. असे असताना येथील काटक शेतकरी निसर्गाची अवकृपा आणि कवडीमोल भावाने कधी खचला नाही.

काळी आई दगा देत नाही

गेल्या १० वर्षांत उत्पन्न खर्चही भरून निघाला नव्हता, यंदा कष्टाचे चीज झाले. काळी आई दगा देत नाही, संयम ठेवल्यास शेतीत यशस्वी होता येते. एप्रिलमध्ये क्रेटमागे ५० रु. दर असताना कर्ज काढून ४.५ एकरांत टोमॅटो लागवडीचे धाडस केले. निसर्ग आणि बाजारभावाची साथ मिळाल्याने सुमारे १ कोटी उत्पन्न निघाले. यासाठी ९ लाख खर्च आला आहे. - भाऊसाहेब आव्हाड, टोमॅटो उत्पादक

यामुळे वाढले टोमॅटोचे दर

शेतकऱ्यांनी एकरी दोन लाखांचा खर्च करूनही त्यांना सुरुवातीच्या एप्रिल आणि मे महिन्यात दर मिळाला नाही.‌ त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढच्या लागवडी जोपासल्या नाहीत. टोमॅटो हे चार महिन्यांचे पीक आहे. सुरुवातीचे दोन महिने ते बाजारात विकण्यायोग्य होण्यापर्यंत तर दुसरे दोन महिने हे पीक विकण्यासाठी असतात. मात्र दर नसल्यामुळे मे महिन्यात लागवडी कमी झाल्या आहेत. याचा पुरवठ्यावर परिणाम होऊन दरात वाढ झाली. उन्हाळ्यात पिकाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उत्पादनातही घट झाली. त्यामुळे दरवाढ झाली.‌

English Summary: 12 people became millionaires and 55 millionaires in the village with 'tomato'
Published on: 27 July 2023, 08:54 IST