Success Stories

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी म्हटले की डोळ्यासमोर येतात ते हजारे पण याच राळेगणसिद्धीयेथे एका शेतकर्याने चक्क सफरचंदाची बाग लावली आहे. सफरचंद म्हटलं की पटकन कोणाच्याही डोळ्यासमोर उभं राहतं ते काश्मीर.

Updated on 02 May, 2022 4:10 PM IST

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी म्हटले की डोळ्यासमोर येतात ते हजारे पण याच राळेगणसिद्धीयेथे एका शेतकऱ्याने सफरचंदाची बाग लावली आहे.  सफरचंद म्हटलं की पटकन कोणाच्याही डोळ्यासमोर उभं राहतं ते काश्मीर. सफरचंद फळासाठी थंड वातावरण गरजेचे असते.

मात्र, हे विसरायला लावणारी सफरचंदाची यशस्वी लागवड करण्याची किमया आदर्श गाव राळेगणसिद्धी येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र हरिश्चंद्र पठारे यांनी करून दाखवली आहे. हिमाचल प्रदेश येथून १०० सफरचंदाची रोपे आणून लागवड केलेल्या हरमन-९९ या जातीच्या सफरचंदाच्या झाडाला सध्या चांगलीच फळे लगडली आहेत.

पठारे यांना जवळपास ३५ एकर शेतजमीन आहे. ते शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. त्यांनी डाळिंबाची लागवड केली होती. डाळिंबानेही त्यांना भरभराटही दिली. मात्र, सततच्या तेल्या रोगाने त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते. मात्र खचून न जाता त्यांनी डाळिंबाला पर्याय म्हणून वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास करायला सुरुवात केली.

यावेळी पठारे यांनी सांगितले की युट्युबवर शेती विषयक अभ्यास करत असताना राजस्थान येथील शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड केल्याचे पाहिले. त्यावेळी असं लक्षात आलं की राजस्थानमध्ये हे शक्य आहे, तर माझ्या शेतात का नाही? सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. अभ्यासानंतर साधारणतः ४० ते ४५ डिग्री तापमानात येणाऱ्या हरमन-९९ जातीच्या रोपांची निवड केली. त्यासाठी कुठलीच वेगळी खते किंवा मशागत केली नाही.

त्यांनी पंधरा गुंठ्यात प्रयोग म्हणून १०० रोपांची लागवड केली आहे, सफरचंदाची फळधारणा झाली आहे. फळांना चांगला रंग आणि चव आहे. पुढच्या बाराला मोठ्या प्रमाणावर सफरचंदाचे उत्पन्न येण्याची त्यांना आशा आहे. विशेष म्हणजे डाळिंबाच्या तुलनेत या पिकाला पाणी, श्रम आणि खर्च कमी लागते असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, सरपंच डॉ. धनंजय पोटे, माजी सरपंच लाभेष औटी, जयसिंग मापारी, मंगल मापारी, उद्योजक सुरेश पठारे, दादा लक्ष्मण पठारे, दादा महादू पठारे, रमेश औटी, विलास औटी, जालिंदर मापारी, प्राचार्य दिलीप देशमुख, पर्यवेक्षक भाऊसाहेब धावडे, संगिता पठारे, शरद मापारी, सुनील हजारे, विजय पोटे, स्वप्निल गाजरे, दादाराम पठारे, आकाश पठारे आदींसह ग्रामस्थांकडून या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक होत आहे.

पठारे यांच्या अनुभवाचा फायदा घेत अन्य शेतकरीही परिसरात सफरचंदाची लागवड करतील अशी अशा येथील ग्रामस्थांना आहे.  काश्मीरचे सफरचंद दिवाळीच्या दरम्यान विक्रीस येतात तर आपल्या भागातील सफरचंद जून-जुलैपासूनच बाजारात येते. त्यामुळे दर चांगला मिळतो. ठोक बाजारात शंभर रूपये ते सव्वाशे रूपये विक्री होते, पठारे यांच्याकडे पंधरा गुंठ्यात १०० झाडे आहेत. एका झाडापासून साधारणपणे १० ते १५ हजार रूपये मिळू शकतात. अर्धा एकरात १० लाखांचे उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास पठारे यांनी व्यक्त केला. पठारे यांना आतापर्यंत ३० हजार रूपये खर्च आला आहे. आणि त्यातील आंतरपिकांतून २० हजार रूपये मिळाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांना बियाणे आणि खते कमी पडणार नाहीत : कृषीमंत्री दादाजी भुसे
MBA मासावाला!! प्रतिष्ठित कंपनीतील नोकरी सोडून सुरू केली मत्स्यशेती; आता महिन्याकाठी कमवतोय 11 लाख

English Summary: 10 lakh income from half an acre of apple orchard
Published on: 02 May 2022, 04:10 IST