Others News

महिला व बालकल्याण विभागास सन २०२१-२२ चे जिल्हा परिषद निधीचे मुळ अंदाजपत्रकिय तरतुदीमधून १०% महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत विविध योजनासाठी निधी प्राप्त झालेला आहे. तसेच अनुसुचीत जाती उपयोजने अंतर्गत सन २०२०-२१ चा निधी शिल्लक असुन सन २०२१ २२ अंतर्गत तरतुद मंजुर करणेत आली आहे. आदिवासी उपयोजने अंतर्गतही तरतुद मंजुर करणेत आली आहे. महिला व बालकल्याण विभागास प्राप्त झालेल्या निधीतुन खालीलप्रमाणे थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने वैयक्तिक लाभाचे योजना राबविणेसाठी अर्ज मागविणेत आले आहेत.

Updated on 04 September, 2021 7:49 PM IST

१) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना आर्थीक मदत (जि.प.निधी )

 

सन २०२०-२१ मध्ये इ.१० वी / १२ वी मध्ये ८०% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी रक्कम रु. ५०००/- एक रकमी लाभ.

 

 

२) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इ. ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना.

 

सन २०२१-२२ मध्ये MSCIT, CCC वा समकक्ष प्रशिक्षण पूर्ण करणा-या मंलींना र रु.४२००/- लाभ देणेत येईल.

 

 

३) ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायभिमुख व जिवनावश्यक साहित्य पुरविणे अंतर्गत महिलांना पीठगीरणी / शिलाई मशीन / तेलघाणा/ सोलर वॉटर हिटर पुरविणे. जि प निधी / अनुसुचीत जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना.

सदर योजने अंतर्गत पात्र व मंजुरी प्राप्त महिलांना पीठगीरणी / शिलाई मशीन / तेलघाणा / सोलर वॉटर हिटर पुरविणे यापैकी कोणत्याही एका वस्तुचे खरेदी नंतर खालील प्रमाणे लाभ देणेत येईल. पिठगीरणी / तेलघाणा / सोलर वॉटर हिटर प्रत्येकी रक्कम रु.12,000/- चे 90% लाभ, शिलाई मशिन रक्कम रु. 7500/- चे 90% लाभ. टिप- वस्तु खरेदी विभागाने निश्चित केलेल्या किंमती पेक्षा कमी असलेस प्रत्यक्ष खरेदी किंमतीचे 90% व खरेदीची किंमत जास्त असलेस विभागाने | निश्चित केलेल्यास किमतीचे 90% रकमे एवढा लाभ देणेत येईल.(कडबाकुट्टी मशीन योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)

 

 

४) महिलांसाठी घरकुल दुरुस्ती योजना.

 सदर योजने अंतर्गत पात्र व मंजुरी प्राप्त महिलांना महिलांना घरकुल दुरुस्तीसाठी रक्कम रु. ५०,०००/- पर्यंत थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने लाभ देणेत येईल.

 

 

५) पिक टॅक्सी योजना

महिला व मुलीना टॅक्सी ड्रायव्हींगसाठी प्रशिक्षण व टॅक्सी खरेदीसाठी अर्थ सहाय्य (बँकेचे कर्ज घेणेसाठी डाऊन पेमेंट प्रशिक्षण खर्च रक्कम रु. 30,000/- प्रती लाभार्थी च्या मर्यादेत).

 

 

∆ वरील योजनांसाठी अर्ज प्राप्त करुन घेणेची अंतीम दिनांक ३१ ऑगष्ट २०२१ होती. परंतु कोवीड १९ चे संसर्गामुळे उदभवलेल्या परिस्थितीतीने ग्रामीण भागातील महिला सदर योजनांना अर्ज करणेपासुन वंचीत राहु नये म्हणुन सदर योजनांचे अर्ज स्विकारणेसाठी दि.१५.९.२०२१ पर्यंत मुदतवाढ देणेत येत आहे. उपरोक्त योजनांसाठी प्राप्त अर्जाची आपले स्तरावर छाननी करुन सोबत जोडलेल्या प्रपत्रात पात्र लाभार्थ्यांची यादी या कार्यालयास दि. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सादर करावयाची आहे.

अर्जासाठी - येथे क्लिक करा.

 

अर्ज सादर करताना खालील सूचनांचे पालन करावे.

 

१) माहिती विहीत नमुन्यात असावी.

 

२) माहिती देताना १ हार्ड कॉपी (hard copy) तसेच सॉफ़्ट कॉपी (झेरॉक्स) (soft copy) या स्वरुपात द्यावी.

 

३) हार्ड कॉपी तील माहिती व सॉफ्ट कॉपी तील माहिती याचा मेळ असावा.

 

४) माहिती ISM V६ (Unicode) मधे असावी.

 

५) अहवाल वर्ड फ़ाईल (word file) मधे असावा.

 

६) सर्व माहिती A4 कागदावर असावी.

 

स्रोत - https://www.bsaaplesarkar.com

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: ZP scheme Women and Child development department.
Published on: 04 September 2021, 07:49 IST