सद्यपरिस्थितीत कोणाकडे स्मार्टफोन नाही असं होऊच शकत नाही. मोबाईल शिवाय आजचे जगणे म्हणजे आत्मा नसलेल्या शरीरा सारखे आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु बऱ्याचदा या मोबाईल फोनचा वापर हा चुकीच्या गोष्टींसाठी जास्त होताना दिसतो.
परंतु याच फोनचा वापर जर कौशल्यपूर्ण रीतीने केला तर अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला साहाय्यकारी सिद्ध होऊ शकतो.आपल्याला माहित आहेच की स्मार्टफोन च्या विविध प्रकारचे वैशिष्ट्ये, ॲप्स मुळेआपण आपल्या कामाच्या नोंदी तसेच इतर जगाशी जोडून राहणे शक्य आहे. महत्वाचे डॉक्युमेंट्स, मेल्स तसेच इमेजेस तुम्ही अगदी एका क्लिकणे फोन मधून दुसऱ्या पर्यंत पोहोचू शकता.जर तुम्ही एखाद्या व्यवसायात असाल तर याच स्मार्टफोनचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी करू शकतात.तो कसा? याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
व्यवसायवृद्धीसाठी स्मार्टफोनचा वापर
फोन मध्ये व्हाट्सअप प्रत्येक जण वापरत असतो. परंतु उगीच नको त्या ग्रुपचे सदस्य होण्यापेक्षा या ग्रुपचा आपल्या व्यवसाय वाढीसाठी उपयोग करता येईल अशा ग्रुपचे सदस्य होणे महत्त्वाचे असते. ग्रुप मध्ये समाविष्ट झाल्यानंतर उगीचच चुकीची माहिती किंवा एखादी अफवा पसरवू नका. ग्रुपचा व्यावसायिकपणा जपणे फार महत्त्वाचे असते तसेच ग्रुपमध्ये नसते विनोद किंवा नको त्या पोस्ट फॉरवर्ड करण्यापेक्षा आपल्या प्रोडक्टची माहिती ग्रुप मध्ये देणे महत्त्वाचे असते त्यासाठी ॲडमिन ची परवानगी घ्या.तसेच ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सर्व कॉन्टॅक्ट घेण्याअगोदर त्यांना खरंच तुमच्या उत्पादनाविषयी इंटरेस्ट आहे का ते विचारा.
अनावश्यक माहिती किंवा फोटो शक्य असेल तेव्हा डिलीट करत चला.कधीही आपण जे काम करतो त्याचे एक व्यवस्थितफोल्डर बनवावे व त्यामध्ये आपला सगळा डेटा एकत्र ठेवावा. व्हाट्सअप हे नुसते मनोरंजनाचे साधन नसून ते तुमच्या कामासाठी, तुमच्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी व तुम्हाला सहजरीत्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल असे एक प्रभावी साधन आहे. हजारो लोकांपर्यंत तुमी या व्हाट्सअप च्या माध्यमातून नियोजन आणि आणि व्यावसायिक दृष्टिकोनाने पोहोचू शकतात.
फोन वापरण्याची ही पद्धत आहे उपयोगी
फोन वापरताना काही नियम पाळले तर ते समोरच्या व्यक्तीला सुद्धा चांगले वाटते. जर आपण पहिल्यांदाच कोणाशी बोलणार असू तर कधीही व्हाट्सअप वर व्हॉइस व्हिडिओ कॉल करणे टाळा. जर करणे अनिवार्य असेल तर समोरच्या ची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी फोनवर बोलतो तेव्हा आपला आवाज कमी असू देणे फार महत्त्वाचे आहे.एखाद्याशी बोलताना ज्या मुद्द्यावर बोलायचे त्या मुद्द्याचे बोला. ज्यांना आपण पहिल्यांदाच कॉल करतोय तेव्हा लगेच बोलणं सुरू न करता अगोदर आपली ओळख करून देणे महत्त्वाचे असते. पहिल्यांदा कॉल करताना अशा व्यक्तीला कॉल करण्याआधी त्यांना मेसेज करून बोलण्याची योग्य वेळ कोणती ते विचारणे फारच महत्त्वाचे ठरेल.
फोनची रिंगटोन उगीचच एखादा फिल्मी गाणेठेवण्यापेक्षा त्यामध्ये सुद्धा व्यावसायिकता दाखवले तर खूपच उत्तम. व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला नंबर हा परत परत बदलू नका. जो नंबर आपला आहे तोच नंबर कायमस्वरूपी ठेवणे फार महत्त्वाचे आहे कारण तुमच्या उद्योगधंद्याच्या प्रगतीसाठी उपयोग होईल कारण तुमचा फोन नंबर हीपण तुमची ओळख असते.
Published on: 07 March 2022, 09:04 IST