देशात कोरोना व्हायरसमुळे नागरिक हैराण झाले आहेत, देशातील अनेक राज्यात परत लॉकडाऊन करण्यात येत आहे. नागरिकांना या काळात मोफत अन्न धान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य पुरवण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्ड ज्या नागरिकांकडे नाही त्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे. परंतु अशातच रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने देशात वन नेशन वन रेशन कार्डची योजना देशात लागू केली आहे. यासाठी आपल्याला रेशन कार्डशी आपले आधार कार्ड जोडावे लागणार आहे.
आधार कार्ड संलग्न करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंतच आहे, म्हणजेच तुमच्या हातात फक्त पंधरा दिवस आहेत. जर आपल्या रेशन कार्डधारकांच्या नावाने तीन महिन्यांपासून धान्य घेतले नसेल तर आपले नाव रेशन कार्डमधून काढण्यात येईल. परंतु यापूर्वी पडताळणी व इतर औपचारिकता पूर्ण केल्या जातील. दरम्यान मध्य प्रदेशातील काटनी या जिल्ह्यात साधरण १२ हजार परिवार आहेत, जे गेल्या तीन महिन्यापासून रेशन कार्डवरून धान्य घेत नाहीत. या कुटुंबांना बनावट असल्याचे समजले जात आहे. सार्वजनिक वितरणानुसार सर्व रेशन कार्डधारकांना आधार कार्ड जोडावे लागणार आहे.
जर रेशन कार्डशी आधार कार्ड जोडले नाही तर त्या सदस्यांना रेशन म्हणजे धान्य दिले जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार वन नेशन वन पेन्शन या योजनेच्या अंतर्गत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास सांगत आहे, यामुळे दोन्ही कार्ड ३१ जुलैपर्यंत संलग्न करणे आवश्यक आहे. याची जबाबदारी पी.ओ.एस मशीनसह स्वस्त धान्य दुकानदारावर दिली आहे. यासह ग्रामसेवक, नोडल अधिकारी यांच्यावर या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Published on: 14 July 2020, 01:24 IST