रेशनकार्ड.. एक महत्वाचा सरकारी दाखला.. सरकारकडून दिला जाणारा भारतीय नागरिक असल्याचा पुरावा.. सरकारी, तसेच खासगी कामासाठी सर्रास वापरला जाणारा ओळखीचा पुरावा.. शिवाय रेशनकार्डच्या माध्यमातूनच देशभरातील गरीब-गरजूंना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त दराने धान्य दिलं जातं..
रेशन कार्डधारकांची यादी वेळोवेळी ‘अपडेट’ केली जाते. अशा वेळी तुमचं नाव रेशनकार्ड लिस्टमधून कट झाले तर..? सरकारच्या विविध योजनांपासून तुम्ही वंचित तर राहालच.. शिवाय एक महत्वाचे ओळखपत्रही गमावून बसाल.. नि त्यामुळे तुमची अनेक कामे अडकू शकतात..
या सेवांना मुकाल..!
– कोरोना काळात मिळणारं मोफत धान्य
– स्वस्त दरात मिळणारे धान्य
– रहिवाशी पुरावा म्हणून रेशन कार्ड वापरता येणार नाही.
– गॅस कनेक्शनही कट होऊ शकते
रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारला विविध योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती मिळते.. त्यानुसार मदत करणे, सवलती देण्याचे नियोजन करता येते.. त्यामुळे रेशन कार्ड (ration card) वेळोवेळी ‘अपडेट’ करणंही गरजेचं असतं..
अशा वेळी तुमचे नाव रेशन कार्डधारकांच्या यादीतून कट होणार नाही, याबाबत काळजी घ्यायला हवी.. यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे तुम्हाला अगदी घरबसल्याही समजू शकते. त्यासाठीची प्रोसेस जाणून घेऊ या..
यादीत असे करा नाव चेक
– रेशन कार्ड लिस्टमध्ये नाव चेक करण्यासाठी सुरुवातीला अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx वर जा. त्यावर ‘रेशन कार्ड’ या पर्यायावर क्लिक करा.
– नंतर ‘Ration Card Details On State Portals’ पर्यायावर क्लिक करा. नंतर तुमचे राज्य, जिल्हा निवडा. मग तुमचा ब्लॉक आणि पुढील माहिती भरा.
– रेशन कार्डचा प्रकार निवडा. इथे समोर एक यादी दिसेल, त्यात कार्डधारकांची नावे असतात. या यादीत तुम्हाला तुमचे नाव तपासता येते.. यादीत नाव नसल्यास कट झालं असे समजावे.
दरम्यान, रेशनकार्ड तीन प्रकारची असतात. दारिद्र्यरेषेवरील लोकांसाठी एपीएल (APL), गरीबी रेषेखालील लोकांसाठी बीएलपी (BPL), अतिशय गरीबांसाठी अंत्योदय कार्ड दिले जाते. वार्षिक उत्पन्नानुसार हे कार्ड मिळते. प्रत्येक भारतीय रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षांखालील मुलांची नावे आई-वडिलांच्या कार्डमध्ये जोडली जातात.
Published on: 22 February 2022, 11:48 IST