एपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये तुमचेही खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास उपयोगाची आणि महत्त्वाचे आहे. बर्याच जणांच्या पीएफ खात्याच्या संबंधित बऱ्याच तक्रारी असतात. किंवा काही समस्या येत असतात
या तक्रारी किंवा समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कार्यालयातवारंवार फेर्या माराव्या लागतात.परंतु आतायासंबंधीचे तुमची कोणतीही तक्रार असेल तर तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.कारण तुम्ही आता पीएफ खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रारऑनलाईन नोंदणी(Online Registration)सोडवू शकणार आहात.एवढेच नाही तर तुमच्या तक्रारीची स्टेटस देखील तुम्ही ऑनलाईन पाहू शकणार आहात.एपीएफो खातेदारालापैसे काढणे,खात्यात पैसे ट्रान्सफर करणेकिंवा केवायसी इत्यादींसंबंधीबऱ्याच तक्रारी येतात.आता या तक्रारींचेनिवारण खातेधारक तक्रार व्यवस्थापन प्रणाली च्या सुविधेचा लाभ घेऊन करू शकतात. यासाठी एपीएफओ ने खाते धारकांसाठी epfigms.gov.in वर त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करून त्यांच्या समस्यांबाबत ऑनलाईन माहिती देण्याचे आवाहन केले आह. यासाठी एपीएफओ ने टोल फ्री नंबर जारी करण्यात आला असून त्यावर तुम्ही कॉल करून देखील तुमची तक्रार सहज नोंदवू शकता. एपीएफओने ऑनलाईन सेवा ईपीएफओ च्या वेबसाईटवर तसेच उमंग अॅप वर देखील उपलब्ध केले असून त्या सेवा मिळू शकतात.
अशाप्रकारे नोंदवा तुमची ऑनलाईन तक्रार(Online Process For Submit Complaint)
1- सर्वप्रथम तुम्हाला epfigms.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
2- त्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी रजिस्टर ग्रेवन्स या पर्यायावर क्लिक करावे.
3-तुमच्या समोर एक नवीन वेबपेज उघडते यामध्ये जा स्टेटस मध्ये तक्रार नोंदवली जात आहे ते निवडावे.यामध्ये स्टेटसम्हणजेपीएफ सदस्य, ईपीएस पेन्शनर, नियोक्ता किंवा इतर
4- तुमच्याकडे तुमचा UAN/ पेन्शन पेमेंट ऑर्डर नसल्यास इतर पर्याय निवडा. जर तुम्हाला पीएफ खात्याशी संबंधित तक्रारीसाठी पिएफ मेंबर स्टेटस निवडा. आता युएएन आणि सुरक्षा कोड टाका आणि गेट डिटेल्स वर क्लिक करा.
5-त्यानंतर गेट ओटीपी वर क्लिक करा.त्यानंतर ईपीएफओ डेटाबेसमध्येरजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर ओटीपी पाठवला जातो.हा ओटीपी इंटर केल्यानंतर व्हेरिफाय होतो आणि नंतर तुम्हाला वैयक्तिक तपशील विचारले जातात.सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स विचारले जातात त्यानंतर ज्या PF क्रमांकावर तक्रार दाखल करायचे आहे त्यावर क्लिक करावे लागते.
6-त्यानंतर स्क्रीनवर एक पॉप-अप दिसतो. यामध्ये तुमची तक्रार रेडिओ बटनाशी संबंधित आहे ते निवडावे. त्यानंतर तक्रार कॅटेगरी निवडा आणि तुमच्या तक्रारी चा तपशील द्या.तूमच्याकडे काही पुरावे असतील तर ते अपलोड करता येतात.
7- तक्रार नोंदविल्यानंतर ॲड वर क्लिक करून सबमिट करा. त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाते. तुमचातक्रार आयडी तुमच्या रजिस्टर ईमेल आणि मोबाईल नंबर वर पाठवला जातो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या तक्रारीची स्टेटस तपासण्यासाठी वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळावर जाऊन views स्टेटस हा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकल्यानंतर सेक्युरिटी कोड टाकावा. यानंतर तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती दिसते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:ड्रायव्हिंग लायसन्सचे बदलले नियम; जाणून घ्या
नक्की वाचा:कौतुकास्पद : बीजोत्पादन प्रकल्पात राहुरी कृषी विद्यापीठ देशात प्रथम
Published on: 14 May 2022, 06:38 IST