Others News

जवळपास सर्वच महत्त्वाच्या कामासाठी ओळख म्हणून आधार कार्ड ची मागणी केली जाते.

Updated on 28 January, 2022 6:09 PM IST

जवळपास सर्वच महत्त्वाच्या कामासाठी ओळख म्हणून आधार कार्ड ची मागणी केली जाते. रोज वापरण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून अनेक लोक PVC आधारकार्ड वापरतात, परंतु युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकल दुकानातून बनवलेले आधार PVC कार्ड आता अवैध घोषित केले आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांनी जारी केलेल्या

सुरक्षित बाबींमध्ये बाजारातून तयार केलेली पीव्हीसी आधार कार्ड असुरक्षित असून ती वापरू नयेत असे सांगण्यात आले असून UIDAI च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांचे आधार कार्ड अवैध ठरले आहे. यामुळे आता यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल.

PVC आधारकार्ड म्हणजे काय ?

PVC कार्ड वर आधार कार्डची माहिती दिलेली असते. हे कार्ड वापरण्यासाठी किंवा सोबत बळगण्यासाठी सोपे असते. 

UIDAI नुसार, या कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, आधार कार्ड दिल्याची तारीख आणि कार्डची प्रिंट केल्याची तारीख आणि इतर माहिती देण्यात आलेली असते. छोट्या आकाराचे असल्याने ते खिशात किंवा पर्समध्ये नेणे सोपे जाते, त्यामुळे हे कार्ड अनेक जण वापरतात.

यासाठी खालील प्रक्रिया करणे महत्त्वाची आहे,

१) UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.

२) येथे ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर .

३) तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी (EID) एंटर करा.

४) सुरक्षा कोड किंवा कॅप्चा एंटर करा.

५) OTP मिळवण्यासाठी Send OTP वर .

६) रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा.

७) सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डचे प्री-व्ह्यू दिसेल.

८)खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शनवर .

९) त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला पेमेंट पेज दिसेल

व येथे 50 रुपये फी भरा.

१०) तुम्ही पेमेंट करताच तुमच्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल आणि टपाल विभागाच्या स्पीड पोस्टद्वारे काही दिवसांनी पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल.

English Summary: Your aadhar will illigal UIDAI announced
Published on: 28 January 2022, 06:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)