Others News

बाजारामध्ये गुंतवणुकीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. गुंतवणूक करताना व्यक्ती आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहावी असा पर्याय शोधत असतात. असे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये प्रत्येक पर्यायांमध्ये व्याज दर हे वेगवेगळे असतात

Updated on 07 November, 2021 9:17 PM IST

बाजारामध्ये गुंतवणुकीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. गुंतवणूक करताना व्यक्ती आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहावी असा पर्याय शोधत असतात. असे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये  प्रत्येक पर्यायांमध्ये व्याज दर हे वेगवेगळे असतात

शेअर मार्केट,मॅच्युअल फंड हे गुंतवणुकीचे प्रकार आहेत परंतु या पर्यायांमध्ये जोखीम जास्त आहे.गुंतवणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विचार केला तर ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करताना मुदत ठेव म्हणजे एफडीया पर्यायाचा प्राधान्याने विचार करतात. परंतु मागील काही वर्षांपासून मुदत ठेवींवरील व्याजदर हे मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येकबँकेचे व्याजदर हे वेगळेअसतात. या लेखात आपण विविध बँकांचे एफडी वरील व्याजदर जाणून घेऊ.

 विविध बँकांचे एफडी वरील व्याजदर

  • डीसीबी बँक(DCB BANK)- डीसीबी बँकेत जर तीन वर्षाच्या मुदत ठेववर ज्येष्ठ नागरिकांना 6.45टक्के व्याज देते. उदाहरणार्थ या व्याजदर प्रमाणे एक लाख रुपये जर तुम्ही तीन वर्षासाठी गुंतवणूक केले तर एकूण रक्कम एक लाख 21 हजार रुपये होईल.
  • आरबीएल बँक(RBL BANK)- आरबीएल बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षाच्या एफडीवर6.80 टक्के व्याज देते. त्यामध्ये तुम्ही जर एक लाख रुपये तीन वर्षासाठी गुंतवले तर त्याचे एक लाख 22 हजार रुपये होतील.

 

  • येस बँक(YES BANK)- येस बँक ही खासगी क्षेत्रातील बँका असून ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षाच्या एफडीवरसात टक्के व्याजदर देते आहे.  येस बँक ही खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देते.
  • आयडीएफसी फर्स्ट बँक- आयडीएफसी फर्स्ट बँक तीन वर्षाच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 6.25टक्के व्याज देत आहे.या बँकेत जरतीन वर्षासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तरया रकमेचे एक लाख तीस हजार रुपये होतात.या बँकेत एफडी करण्यासाठीकमीत कमी दहा हजार रुपयांचे करावी लागते.
  • इंडसइंड बँक(IndusInd bank)- एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे.  ही बँक तीन वर्षाच्या मुदत ठेवीवर जेष्ठ नागरिकांना 6.50 टक्के व्याज देते.

( माहितीसाठी साभार-timesNowNews मराठी)

English Summary: you fixed diposit your money in bank here some bank list to give more intrest rate on fd
Published on: 07 November 2021, 09:17 IST