जर आपण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहात आणि आपले नाव राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सरकार द्वारा पीएम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु गेल्या चार महिन्यांपासून किंवा काही महिन्यांपासून बँक खात्यात पैसे येत नाहीत. अशी स्थिती प्रत्येकजण अनुभवत आहात का मग काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील. पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे सहज येतील, आणि पैसे का येत नव्हते याचे उत्तरही आपल्याला कळेल.
जर आपल्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ नाही मिळाला असेल तर आपल्या आधार कार्ड किंवा बँक अकाउंट आणि इतर कागदावर नावाची स्पेलिंगमध्ये अंतर असेल किंवा चुकी असेल. नावात चुकी असल्यामुळे बहुतेक लोकांच्या खात्यात पैसे आले नाहीत.
जर असे काही असेल त्या चुका दुरुस्त करा. ह्या चुका आपण घरी बसूनही दुरुस्त करु शकता. PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://pmkisan.gov.in/) जा. यात फार्मर कॉनरच्या आत जाऊन Edit Aadhaar Detail या पर्यायावर क्लिक करा. येथे आपला आधार नंबर टाका. यानंतर एक कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. जर आपले नाव चुकी आहेचा म्हणजेच अर्जावरीत आणि आधारवर आपले नाव वेगवेगळे आहे. ते हे आपण ऑनलाईनने घरी बसून निट करू शकतो. जर अजून दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा.
जर हप्ता कपात होऊन आला तर काय परत मिळेल
जर कोणत्या शेतकऱ्याचा चालू हप्ता मिळालेला नाही. अर्जात काही तुटी असल्यास आणि तुटी आपण दुरुस्त केल्यास आपल्याला पैसे मिळतात. याविषयी माहिती स्वत सरकारने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. (https://pmkisan.gov.in/Documents/RevisedFAQ.pdf)
या स्पष्ट सांगण्यात आले आहे की, लाभार्थ्याचे नाव पीएम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु कोणत्या तरी कारणामुळे ते चार महिन्यापासून हप्ता येत नाही. तर सदर तुटी दूर केल्यास लाभार्थ्याला पैसे मिळतील. जर अर्ज केला तरी पैसे मिळत नसतील तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 (Toll Free) वर संपर्क करावा. येथेही आपली तक्रार ऐकली जात नसेल तर आपण मंत्रालयाच्या दुसऱ्यानंबरवर (011-23381092) यावर संपर्क करावा.
Published on: 07 June 2020, 03:39 IST