Others News

मोदी सरकारने मोबाईल कंपन्यांना दिलासा देण्याच्या घोषणेनंतर आता ग्राहकांसाठी ही अनेक प्रकारच्या सुविधा जाहीर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्रालयाने नवीन सिम कार्ड साठी आणि पोस्टपेड मधून प्रीपेड आणि प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये बदलण्याचे नियम बनवण्याचे आदेश जारी केले आहेत.

Updated on 23 September, 2021 5:13 PM IST

 मोदी सरकारने मोबाईल कंपन्यांना दिलासा देण्याच्या घोषणेनंतर आता ग्राहकांसाठी ही अनेक प्रकारच्या सुविधा जाहीर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्रालयाने नवीन सिम कार्ड साठी आणि पोस्टपेड मधून प्रीपेड आणि प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये बदलण्याचे नियम बनवण्याचे आदेश जारी केले आहेत.

 आता जर तुम्हाला घरी बसून नवीन मोबाईल सिम कार्ड घ्यायचे असेल तर ते आता शक्य होणार आहे.यासाठी तुम्हाला संबंधित कंपनीचे ॲप वर किंवा वेबसाईट वर एक अर्ज भरावा लागेल.हा अर्ज भरताना तुम्हाला एक पर्याय क्रमांक द्यावा लागेल जेणेकरून त्या क्रमांकावर ओटीपी पाठवून अर्जदाराची सत्यता तपासली जाऊ शकते. मोबाईल कंपनी अर्जदाराचे सर्व माहितीही डीजीलॉकर किंवा आधार द्वारे मिळालेल्या  माहितीवरून पडताळण्याससक्षम असेल. जर कंपनी आधार वरून माहिती घेत असेल तर अर्जदाराचे संमती घेणे आवश्यक असेल.

जाणून घेऊ प्रक्रिया

अर्जदाराला फार्मवर स्वतःचा फोटो अपलोड करावा लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यावर एक निष्क्रिय सिम कार्ड ग्राहकाला दिलेल्या पत्त्यावर पुरवले जाईल आणि काही प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतर सिमकार्ड ॲक्टिव केलेजाऊ शकते.जेग्राहक बाजारातून किंवा मोबाइल सर्विस कंपनीच्या दुकानातून किंवा एखाद्या मोबाईल चे शोरूम मधून नवीन सिम कार्ड घेतात त्यांना मोठी सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी आता कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही. आता नवीन मोबाईल कनेक्शन साठी ग्राहकांना सिम कार्ड फक्त आधार द्वारे मिळालेल्या माहिती द्वारे घेता येईल.यासाठीदेखील आधार वापरण्यासाठीग्राहकांचे संमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.( माहिती स्त्रोत- टाईम्स नाऊ न्यूज मराठी )

English Summary: you can take sim card without any document
Published on: 23 September 2021, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)