प्रत्येक व्यक्तीला आजकाल महत्वाच्या कामासाठी कर्जाची (Loan) गरज भासत असते, पण ऐनवेळी पैशांची व्यवस्था होत नाही आणि त्यामुळे अनेकांचे महत्वाचे काम वेळेवर पूर्ण होत नाही. परंतु आताच्या ह्या डिजिटल युगात कर्ज घेणे खुपच सोयीस्कर झाले आहे. आता लोन घेण्यासाठी पहिल्या सारखे जास्त डॉक्युमेंटची तसेच पेपरवर्कची आवश्यकता भासत नाही. जर आपण लोन घेण्यासाठी पात्र असाल तर आपणांस लोन घेण्यासाठी फक्त KYC संदर्भात लागणारे दस्ताऐवज जमा करावे लागतात. आपण आता केवळ आधारकार्डने पर्सनल लोन (Get Personal Loan On Aadhar Card) प्राप्त करू शकता.
मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, आता आधार कार्डच्या (Aadhar Card) मदतीने आपण त्वरित पर्सनल लोनसाठी अँप्लाय करू शकता. ह्या त्वरित भेटणाऱ्या पर्सनल लोनला इन्स्टंट पर्सनल लोन (Instant Personal Loan) असे म्हटले जाते. विशेष म्हणजे ह्या पर्सनल लोनसाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अँप्लाय करू शकता. ह्यासाठी आपणांस ऑनलाईन अर्ज करावा लागतो तसेच e-KYC साठी लागणारे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. ह्या लोन संदर्भातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची हार्ड कॉपी बँकात जाऊन जमा करावी लागत नाही. त्यामुळे आपला वेळ तर वाचतोच शिवाय डॉक्युमेंट साठी भटकावे लागत नाही.
जाणुन घ्या इन्स्टंट पर्सनल लोनसाठी कसं करणार अँप्लाय (How to Apply for an Instant Personal Loan)
»मित्रांनो जर आपल्याला ही पर्सनल लोन हवं असेल तर बँकेच्या अधिकृत वेबसाईट (Official Website) वर भेट द्या आणि लॉगिन करा तुम्ही बँकेच्या अधिकृत मोबाईल अँप द्वारे देखील लॉगिन करू शकता.
»बँकेच्या ऑफिसिअल साईट वर अथवा मोबाईल अँप वर गेल्यानंतर तुम्हाला सर्व्यात आधी इलीजीबीलिटी (Eligibility) चेक करावी लागेल म्हणजे तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे तपासाव लागेल त्यासाठी बँकेच्या साईट वर लोनचा (Loan) ऑप्शन दिसेल तिथे जाऊन पर्सनल लोन मध्ये जा आणि तिथे इलीजीबीलिटी चेक करा. मग तुम्ही जर लोन घेण्यासाठी पात्र असाल तर अँप्लाय नाऊ ह्या पर्यायावर क्लिक करा
»हे केल्यानंतर लोन साठी लागणारा अँप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स जसे की, तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर इत्यादी भराव्या लागतील. तुम्हाला तुमच्या जॉब विषयी देखील माहिती भरावी लागेल.
»अँप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून एक कॉल करण्यात येईल जे की तुमची डिटेल्स व्हेरिफाय करतील. वेरिफिकेशन यशस्वीरीत्या संपन्न झाल्यावर आपले लोन अप्रूव्ह केले जाईल.
»बँकेने लोन पास केल्यानंतर लोनची रक्कम ही तुमच्या बचत खात्यात जमा केली जाईल.
पर्सनल लोन पात्रतेसाठी काही नियम व अटी (Some terms and conditions for personal loan eligibility)
मित्रांनो पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचे संबंधित बँकेत खाते असणे अनिवार्य आहे, तसेच तुम्ही भारताचे नागरिक असायला हवेत.
लोन घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 23 असणे अनिवार्य आहे तसेच मल्टिनेशनल किंवा खाजगी कंपनीत नोकरी असायला हवी आणि आपल्याला आपल्या पगाराविषयी बँकेला माहिती देणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला पगाराची स्लिप (Payment Slip) द्यावी लागेल. पर्सनल लोन मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते क्रेडिट स्कोरची त्यामुळे जर तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला लोन सहज मिळू शकते.
Published on: 16 October 2021, 08:09 IST