Others News

नकारात्मक विचार सामाजिक जीवनात आणि कामांमध्ये मोक्याच्या वेळी अस्वस्थता निर्माण करतात. सामाजिक अस्वस्थता वरील बऱ्याच उपचार पद्धती मध्ये नकारात्मक विचारसरणीचे परिस्थितीबद्दल च्या जास्त सहाय्यक आणि सकारात्मक दृष्टिकोनात बदल करण्यासंदर्भातील घटकांचा समावेश असतो.

Updated on 24 February, 2022 7:06 PM IST

नकारात्मक विचार सामाजिक जीवनात आणि कामांमध्ये मोक्याच्या वेळी अस्वस्थता निर्माण करतात. सामाजिक अस्वस्थता वरील बऱ्याच उपचार पद्धती मध्ये नकारात्मक विचारसरणीचे परिस्थितीबद्दल च्या जास्त सहाय्यक आणि सकारात्मक दृष्टिकोनात बदल करण्यासंदर्भातील घटकांचा समावेश असतो.

नकारात्मक विचार बदलण्यासाठी सर्वप्रथम आपली विचार करण्याची पद्धत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या समजून घेणे आवश्यक असते त्यानंतर ते बदलण्यासाठी किंवा त्यांचा परिणाम कमी करण्याची पद्धत ठरवता येते सामान्यत: हे सर्व तज्ञांच्या मदतीने केले जाते. पण मानसिक अस्वस्थतेवरमात करण्याच्या स्वतःला मदत करण्याचा प्रयत्नांमध्ये सुद्धा याचा वापर करता येतो.

  • आपली नकारात्मक मानसिकता बदलण्यासाठी खालील सहा गोष्टी नक्कीच उपयोगी ठरतील:
  • आपली विचार करण्याची शैली समजून घ्या

 नकारात्मक विचार बदलण्याच्या प्रक्रियेतून पहिली पायरी म्हणजे आपण कसा विचार करतो, हे समजून घेणं. उदा. जर एखाद्या परिस्थितीत टोकाच्या यशाचे किंवा अपयशाची विचार करण्याची सवय तुम्हाला असेल, तर तुमची विचार पद्धती सदोष आहे.

अशा सदोष विचार पद्धती आपल्याला वास्तविक परिस्थिती पासून दूर नेतात आणि लोकांकडे व परिस्थितीकडे आपण अव्यवहार्यपणे पाहतो.

  • नकारात्मक विचार करणे कसे

थांबवायचे:

 विचारांची पुनर्रचना ही वैचारिक प्रक्रियेतून वागण्यावर केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे. ही प्रक्रिया तुम्हाला नकारात्मक विचार ओळखून त्यांची जास्त सहाय्यक आणि अनुकूल प्रतिसादास रूपांतर करण्यास मदत करतात.

 स्वतःहून किंवा उपचार करताना, वैचारिक पुना रचनेमध्ये नकारात्मक विचार ओळखणे,त्यांचे अचूक  मूल्यमापन करणे आणि मग त्यांच्या जागी मनावर नवीन विचार ठसवणे अशा पायर्‍यांचा समावेश असतो.

 नवीन पद्धतीने विचार करणे सुरुवातीला कठीण जाते, पण सरावातून कालांतराने सकारात्मक व तर्कसंगत नैसर्गिकरित्या सुचू लागतात.

  • टीकेचा सामना कसा करावा:

 वैचारीक पुनर्रचना सोबतच स्वतःचा आत्मविश्वास बचाव सुद्धा कधीकधी सहाय्यक ठरतो. काही वेळा लोकांच्या तीव्रटीकेला तोंड द्यायची वेळ आली तर तुमच्याकडे नापसंती टिकवण्याची ताकद असणं महत्वाचे ठरते.

 यासाठी सामान्यत: तुम्ही रोग निवारण तज्ञ यांच्यातील काल्पनिक संवादातून मानसिक ठामपणा आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद देण्याचं कौशल्य निर्माण केलं जातं.गृहपाठ च्या  माध्यमातून हे कौशल्य वास्तविक जगात जातात.

  • मानसिक संतुलन कसे मिळवावे:

 मानसिक संतुलनाचे मूळ ध्यान धारणा मध्ये आहे.ध्यानधारणेमुळे आपल्याच भावना आणि विचारांपासून स्वतःला विलग करण्याचा सराव होतो. आणि आपण कोणत्याही गोष्टीकडे तटस्थ पाहू शकतो.

 मानसिक संतुलनाच्या प्रशिक्षणामध्ये आपण आपल्याच भावना आणि विचारांकडे त्या जशा आहेत, तशा पाहायला शिकतो आणि त्यांचे निरीक्षण करायला अथवा सोडून द्यायला शिकतो. आपल्या मेंदूच्या विचार करणाऱ्या भागालाताबा घेण्यास लावून स्वतःच्या भावनिक प्रतिसादांवर नियंत्रण मिळवणे, हे मानसिक संतुलनाचे ध्येय आहे.

  • विचार थांबवण्याने फायदा का होत नाही?

 विचार थांबवू नाही मानसिक संतुलनाच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामध्ये आपण नकारात्मक विचारांचा शोध त्यांना थांबवण्यासाठी करत राहतो आणि ते निघून गेले असे सांगत राहतो.

 त्यामुळे नकारात्मक विचारांना थांबवायचा जितका जास्त प्रयत्न होईल, तितके जास्त ते येत राहतील. म्हणून विचार थांबण्यापेक्षा मानसिक संतुलन योग्य ठरते.शिवाय मानसिक संतुलनामुळे विचारांमधील नकारात्मकता कमी होते आणि त्यांचा तुमच्या वर होणारा परिणाम देखील कमी असतो. विचार प्रक्रिया थांबवणे हे जरी थोडावेळ फायदेशीर ठरलं,तरी दीर्घ काळात यामुळे अस्वस्थता निर्माण होते.

  • विचारांची नोंद करून ठेवणे:

 यामुळे आपली नकारात्मक विचार शैली ओळखायला आणि आपले विचार कशाप्रकारे आपल्या भावनिक प्रतिसादाचे कारण असतात हे जास्तीत जास्त समजून घ्यायला मदत होते. मनात येणारे विचार लिहून काढल्यामुळे आपली नकारात्मक विचारसरणी आणि भावनिक प्रतिसाद यामधील संबंध कळायला मदत होते.

 अशाप्रकारे विचारांच्या विश्लेषणातून नकारा बद्दलचे अतार्किक विचार निघून जाऊन सकारात्मक, जास्त सहाय्यक विचार त्यांची जागा घेतात.( संदर्भासाठी साभार- स्मार्ट उद्योजक)

English Summary: you can stop negative thinking in your mind by apply this important thing in daily routine
Published on: 24 February 2022, 07:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)