Others News

केंद्र शासनाने सुरू केलेल्या पशूसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी केली होती परंतु या योजनेचा पंधरा हजार कोटींचा निधी या वर्षी देण्यात आला आहे.

Updated on 03 September, 2021 1:10 PM IST

 केंद्र शासनाने सुरू केलेल्या पशूसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी केली होती परंतु या योजनेचा पंधरा हजार कोटींचा निधी या वर्षी देण्यात आला आहे.

 या योजनेच्या माध्यमातून दूध प्रक्रिया (आईस्क्रीम,चीज निर्मिती, मील्क पाश्चरायझेशन, दूध पावडर इत्यादी ), मास निर्मिती व प्रक्रिया पशुखाद्य,टी एम आर ब्लॉग्स,बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण मुरघास निर्मिती  तसेच पशु पक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 60 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून या मधील व्याजदरात तीन टक्के सूट देण्यात येणार आहे.

 या योजनेचा लाभ कसा घ्यावा?

  • योजनेसंबंधी चा अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्रशासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या https://dahd.nic.in/ahdfया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर  https://ahd.maharashtra.gov.inलिंक देण्यात आली असून या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यातआले आहेत.

 विविध उद्योग व्यवसाय यासोबतच लिंगविनिश्चितवीर्य निर्मिती,बाह्य फलन केंद्र,पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्याजातींचे संवर्धन या बाबींचा समावेश केला आहे.

या योजनेचा व्यक्तिगतव्यावसायिक शेतकरी उत्पादक संस्था खाजगी संस्था कलम 88 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल.या योजनेचा राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठीकेंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत विकास निधी उपयुक्त असून राज्यातील इच्छुक व्यावसायिक उद्योजक व संस्था या या योजनेचा लाभघेऊ शकता.

English Summary: you can start animal husbundry related bussiness through schemes
Published on: 03 September 2021, 01:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)