मित्रांनो भारत सरकार अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना आणत असते. सोलर एनर्जी देखील अशाच ऊर्जेचा एक भाग आहे आणि सरकार ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर रूफटॉप नामक योजना राबवित आहे. ह्या योजनेद्वारे सरकार सोलर पॅनल आपल्या घरावर बसवण्यासाठी सबसिडी पुरविते. ह्याद्वारे अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याचे सांगितले जाते.
मित्रांनो जर आपण आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवला आणि ह्यापासुन निर्मित विजेचा वापर केला तर आपण विजेवर होणाऱ्या खर्चात जवळपास 50 टक्के बचत करू शकतात असे सांगितलं जात आहे. सोलर रूफटॉप पासुन सलग 25 वर्ष वीज हि आपल्याला मिळत राहील आणि ह्या सोलर रूफटॉप साठी येणारा खर्च हा 5 ते 6 वर्षात वसुल होईल. त्यानंतर सोलर रूफटॉप पासुन जवळपास 20 वर्ष वीज हि तुम्हाला निशुल्क मिळत राहील.
1 किलोवॉट सौर ऊर्जाच्या रूफटॉप साठी पाहिजे 10 चौरस मीटर जागा
मित्रांनो जर आपणांस एक किलोवॅट सौर रूफटॉप बसवायचा असेल तर ह्या सौर ऊर्जेच्या प्लांटसाठी आपणांस 10 चौरस मीटर जागेची आवश्यकता भासेल. आणि तुम्हाला सोलर रूफटॉप बसवण्यासाठी 3 KV पर्यंतच्या सोलर रूफटॉप प्लांटवर 40 टक्के सबसिडी आणि 3 KV नंतर 10 KV पर्यंत 20 टक्के सबसिडी हि केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. जर आपणांस ह्या सौर रूफटॉप अनुदान योजनेविषयी जाणुन घ्यायचे असेल व जास्तीची माहिती हवी असेल, तर आपण वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधा. तसेच ऑनलाईन ह्या योजनेविषयी जाणुन घेण्यासाठी व माहितीसाठी mnre.gov.in ह्या सरकारच्या ऑफिसिअल साईटला भेट द्या.
पीएम सोलर रूफटॉप योजनेसाठी अस करा ऑनलाईन अँप्लाय
केंद्र सरकार सोलर रूफटॉप सबसिडी योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे सौर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. जर आपणासही ह्या योजनेसाठी अँप्लाय करायचं असेल तर खालीलप्रमाणे आपण अँप्लाय करू शकता.
»सोलर रूफटॉप योजनेसाठी ऑनलाईन अँप्लाय करण्यासाठी आपल्याला सरकारच्या solarrooftop.gov.in या ऑफिसिअल साईटला भेट द्यावी लागेल.
»ऑफिसिअल साईट वर गेल्यानंतर आपल्याला होम पेजवर Apply for Solar Rooftop हा पर्याय दिसेल ह्यावर वर क्लिक करा.
»त्यानंतर आपण ज्या राहता त्या राज्याच्या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.
»त्यानंतर आपल्या पुढे सोलर रूफटॉप योजनेचा फॉर्म ओपन होईल तो पूर्ण भरा आणि सबमिट करा.
»ह्या पद्धत्तीने आपण ह्या योजनेसाठी ऑनलाईन अँप्लाय करू शकता.
माहितीस्रोत जागरण
Published on: 27 October 2021, 12:52 IST