सध्या एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी आपण फोन पे,गुगल पे पेटीएम सारखे पर्यायांचा विचार करतो. परंतु बऱ्याच जणांकडे युपीआय ऍड्रेस नसतो. त्यामुळे बऱ्याच जणांना पैसे पाठवायचे राहिले तर समस्या निर्माण होते.
परंतु अशाही परिस्थितीत जर तुम्ही भीम ॲप वापरत असाल तर तुम्ही ज्याला पैसे पाठवायचे त्याचा आधार क्रमांक वापरून संबंधिताला पैसे पाठवू शकता. भीम ॲप द्वारे तुम्ही पैसे पाठवता ना आधार क्रमांकाचा पर्याय वापरून पैसे पाठवू शकता. या ॲप वर आधार क्रमांकाचा पर्याय दिसतो.
कशी आहे ही प्रक्रिया?
युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, भीम ॲप मध्ये आधार क्रमांक वापरून पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकावा लागतो आणि verify बटनावर क्लिक करावी लागते.
त्यानंतर या प्रणालीद्वारे संबंधिताच्या आधार क्रमांकाच्या लिंकिंग ची पडताळणी केली जाते व पडताळणी पूर्ण झाल्यावर रक्कम लाभार्थ्याला देण्यात येते. या ॲप वरून लाभार्थ्याला पैसे पाठवताना त्याचे डीबीटी/ आधार आधारित क्रेडिट मीळवण्यासाठी निवडलेल्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केल्यानंतर पैसे जमा केले जातात. यानंतर तुम्ही आधार नंबर आणि फिंगरप्रिंट वापरून व्यापार्यांना डिजिटल पेमेंट करू शकता. जे पेमेंट प्राप्त करण्यासाठी आधार पे पीओएस वापरतात.
जर तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर अशा परिस्थितीत आधार क्रमांक वापरून पेमेंट करताना तुम्हाला ज्या बँकेमार्फत पेमेंट करायचे आहे त्या बँकेचा पर्याय दिसतो. तो पर्याय निवडून तुम्हाला आधारे पेमेंट करता येते. ज्या बँकेतून तुम्ही आधार मार्फत पेमेंट केले त्या बँक खात्यातून लगेच पैसे डेबिट केले जातात.
Published on: 06 October 2021, 09:51 IST