'आई' हा शब्द उच्चारला म्हणजे मनात नव्हे तर एकंदरीत शरीरात उर्मी संचारते. आई या एका शब्दात सर्व काही सामावले आहे. आई शिवाय ह्या जगात काहीच नाही असे म्हटले जाते.
या पार्श्वभूमीवर आई साठी एक स्पेशल गौरवशाली दिवस म्हणून मदर्स डे साजरा केला जातो. यादिवशी आईला काही भेटवस्तू देण्याचा ट्रेंड सध्या मुलांमध्ये आहे. परंतु या दिवशी इतर भेटवस्तू देण्यापेक्षा आपल्या आईला या दिवसाच्या निमित्ताने अशी काहीतरी भेट द्यावी की तिचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे तसेच संकटाच्या वेळी तिलाआर्थिक भेटीचा फायदा होईल असे काहीतरी करणे फार छान राहील. त्यामुळे आईला देता येतील अशा काही तरी आर्थिक सुरक्षिततेची भेट म्हणजे विविध मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणूक योजना आपण जाणून घेऊ.
अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता आईला आर्थिक सुरक्षा
1- आरोग्य विमा- आरोग्य विमा हा पालकांना कोणत्याही प्रकारची लहान किंवा मोठी शारीरिक समस्या निर्माण झाली तेव्हा त्यांना तोंड देता यावे यासाठी दिला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना अडचणीच्या काळामध्ये आर्थिक पाठिंबा मिळेल. जर त्यांनी आधीच एखादा आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही ती टॉप अप करून त्यांना जास्त कव्हरेज मिळवून देऊ शकतात. तसेच याआरोग्य विमा असतानादेखील आयकर कलम 80 डी अंतर्गत करलाभ मिळू शकतो.
2- एखादी मासिक उत्पन्न योजना- तुम्ही आईच्या नावाने पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना देखील गुंतवणूक करू शकतात. अशा योजनेमध्ये 6.6टक्के दराने व्याज दिले जात आहे.योजना आई साठी एक निश्चित उत्पन्नाची आम्ही देऊ शकते. जर तुमचे एकच खाते असेल तर तुम्ही कमाल साडेचार लाख रुपये यामध्ये जमा करू शकतात किंवा तुमच्या संयुक्त खाते असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये तुम्ही जमा केले जाऊ शकतात. यामध्ये मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षाचा आहे.
3- आईच्या नावावर एखादी एफडी किंवा आरडी- तुम्ही आई साठी गुंतवणूक करून तिला आर्थिक सुरक्षा देऊ शकता यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार एखादी मुदत ठेव किंवा आवर्ती ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. त्या दोघांमध्ये तुम्हाला सारखी व्याज मिळते. मुदत ठेव आणि आवर्ती ठेव हे दोन्ही निश्चित उत्पन्न देणारी गुंतवणूक पर्याय आहेत.
या माध्यमातून निश्चित कालावधीत चांगला परतावा मिळतो. या दोन्ही प्रकारांमध्ये व्याजदर जवळपास सारखेच आहेत तसेच तुम्ही यामध्ये संयुक्त खाते उघडू शकतात.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:जरबेराचे गणित! फुलशेती करायची तर जरबेरा फुलांची लागवड ठरेल शेतकऱ्यांसाठी एक टर्निंग पॉइंट
Published on: 08 May 2022, 09:38 IST